शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानानंतर परभणीत निषेध अन् तणाव; परिस्थिती नियंत्रणात

By राजन मगरुळकर | Updated: December 10, 2024 19:02 IST

या प्रकारानंतर सदरील कृत्य करणाऱ्या इसमास परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चोप दिला.

परभणी : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती एका इसमाने जागेवरून काढून तिचा अवमान केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली. या प्रकारानंतर सदरील कृत्य करणाऱ्या इसमास परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चोप दिला. यानंतर घटनास्थळी जमावाने रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. यामुळे शहरात सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पुतळ्याचे मागील काही महिन्यापूर्वी सुशोभीकरण केले होते. पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही संविधानाची प्रतिकृती मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका इसमाने जागेवरून काढली. ही बाब माहीत होताच संबंधित इसमाला परिसरातील जमाव, युवक, नागरिक यांनी चोप दिला. घटनास्थळी नवा मोंढा आणि पोलिस यंत्रणेतील विविध पथके दाखल झाली. त्यानंतर संबंधित इसमास जमावाच्या ताब्यातून घेत पोलिसांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले. 

या प्रकारानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात शेकडो युवक, आंबेडकर प्रेमी नागरिक यांच्यासह जमाव जमला होता. या सर्व जमावाने महामार्गावर पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, नवा मोंढ्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर.बंदखडके यांच्यासह आरसीपी प्लाटून आणि विविध पोलीस पथके दाखल झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकारामध्ये जमावाला आणि आंबेडकर प्रेमी जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले. संबंधित इसमाला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील बाजारपेठ बंदपरभणी शहरातील घटनेनंतर संपूर्ण शहरातील विविध भागातील बाजारपेठ काही वेळातच बंद झाली. विविध ठिकाणी या घटनेची माहिती समाज माध्यमाद्वारे समोर आल्यानंतर सगळीकडे तणाव निर्माण झाला. मुख्य महामार्गावर पुतळ्यासमोर केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, स्टेशन रोड, वसमत महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अशा सर्व भागातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :parabhaniपरभणीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरCrime Newsगुन्हेगारी