कोल्हा ते कोथळा या रस्त्यावरील पुलांवरून पावसाचे पाणी जात आहे. त्यामुळे या मार्गावरील काही पूल वाहून गेले असून, पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. पूर आल्यास गावांचा संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालिका प्रेरणाताई वरपूडकर यांनी २५ जुलै रोजी या भागास भेट दिली. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता कोरे व उपअभियंता शिरोडकर यांचीही उपस्थिती होती. तीन पुलांच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड-२८ योजनेमधून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश वरपूडकर यांनी प्रस्ताव पाठविला आहे. या पुलांच्या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास प्रेरणाताई वरपूडकर यांनी ग्रामस्थांना दिला. यावेळी डॉ. रामचंद्र भिसे, अंबादास तुपसमिंद्रे, परमेश्वर निर्वळ, एकनाथराव कर्डिले, ज्ञानेश्वर फड, सतीश निर्वळ, शिवशंकर पाते, सुनील पाते, कलीम पठाण, कोंडीबा बावणे, लिंबाजी बादाड, संतोष देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, बाबासाहेब देशमुख, दिगंबर समुदकर, चंद्रकांत निर्वळ, गोपाळराव भिसे उपस्थित होते.
कोथळा रस्त्यावरील तीन पुलांचे प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST