शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:24 IST

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची विधान परिषदेत माहिती

ठळक मुद्देप्रादेशिक आरक्षणाबाबतही बैठक घेणारमहाराष्ट्रासाठी ७ वैद्यकीय महाविद्यालयांची राज्य शासनाने मागणी महाविद्यालयासाठी मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबादचा समावेश

परभणी : प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, ही केंद्र शासनाची भूमिका असून, परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली़ 

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता़ त्यानंतर त्याने या संदर्भात २६ जून रोजी विशेष उल्लेखाची सूचनाही सभागृहात मांडली होती़ त्यानंतर उस्मानाबाद येथील भाजपाचे आ़ सुजीतसिंग ठाकूर यांनीही या अनुषंगाने व वैद्यकीय प्रवेशाच्या प्रादेशिक आरक्षणाच्या अनुषंगाने मंगळवारी विधान परिषदेत प्रश्न केला होता़ त्यावेळी उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जिल्हा पातळीवर जेथे जिल्हा रुग्णालय आहे तेथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची राज्य व केंद्र शासनाची भूमिका आहे़ त्याचा ग्रामीण भागातील जनतेला लाभ होणार आहे़ केंद्र शासनाने देशात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार महाराष्ट्रासाठी ७ वैद्यकीय महाविद्यालयांची राज्य शासनाने मागणी केली आहे़ त्यामध्ये मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबादचा समावेश आहे़ तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याचे महाजन यांनी सांगितले़ 

७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षणावर बैठक वैद्यकीय प्रवेशाच्या ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षणासंदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय हे खरे आहे़ यासंदर्भात शासन गांभिर्याने विचार करीत आहे़ यावर्षी वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे पुढील वर्षी या संदर्भातील निर्णय लागू करण्यापूर्वी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून या संदर्भात निर्णय घेऊत व त्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढूत़ या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे़  त्यामुळे याबाबत पडताळणी करून निर्णय घ्यावा लागणार आहे़ निश्चितच या प्रकरणात आपण मार्ग काढूत, असेही महाजन म्हणाले़

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार