शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ताडकळस बाजार समितीकडून प्रमाणित 'माहिती' मिळत नसल्याने संचालकांचे परभणीत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:29 IST

ताडकळस येथील बाजार समितीतून मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांविरुद्ध येथील संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

परभणी : ताडकळस येथील बाजार समितीतून मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांविरुद्ध येथील संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या मासिक बैठकीच्या प्रोसेडींगच्या प्रमाणित प्रती द्याव्यात, बाजार समितीच्या भूखंडाच्या मूळ आराखड्याची प्रत द्यावी, बाजार समितीकडे असलेल्या एकूण भूखंड व गाळ्यांची संख्या तसेच गाळे वाटप केलेल्या तारखेसह गाळेवाटप धारकांची यादी, लिज मुदत संपलेल्या भूखंडाची यादी आदी माहिती संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांकडे मागितली होती.

उपोषणाची नोटीस दिल्यानंतर मागील पत्रावर तारीख बदलून अर्धवट माहिती देण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे सचिव आणि जिल्हा उपनिबंधक हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारपासून संचालकांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, परिपूर्ण माहिती मिळेपर्यंत उपोषण करण्याचा इशारा संचालकांनी बोलून दाखविला आहे. ताडकळस बाजार समितीचे संचालक दिलीपराव आंबोरे, अंकुश जोगदंड, पांडुरंग पौळ, पंडितराव जाधव, भगगवान सलगर, शिवसेना तालुकाप्रमुख उद्धवराव काळे, सुरेश भालेराव आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.