मागील वर्षी तसेच यंदाही कोरोनामुळे रमजान महिना आणि ईद साजरी करताना शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधाचे पालन मुस्लीम समाज बांधवांनी केले. रमजानच्या महिनाभरात केवळ पाच ते सहा दिवस बाजारपेठ पूर्ण उघडी होती. या व्यतिरिक्त केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. यामुळे कपडे, अत्तर, चप्पल, बूट आणि सुका मेवा, दूध यासह विविध साहित्यांची खरेदी अनेकांना करता आली नाही. परिमाणी, यंदाची ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे समाजबांधवांनी ठरविले. यानुसार शुक्रवारी ईदनिमित्त होणारी जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाज पठण यंदा रद्द करण्यात आली होती. प्रत्येकाच्या घरी सकाळी नियोजित केलेल्या वेळी एकत्रितपणे नमाज अदा करण्यात आली. यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी रमजान ईदनिमित्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. अपना कार्नर, ग्रॅन्ड कार्नर, शाही मस्जिद, काद्राबाद प्लांट यांसह शिवाजी चौक, जनता मार्केट आणि कच्छी बाजारात पोलिसांचे फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले होते.
ईदनिमित्त घरोघरी नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST