शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 19:58 IST

१२ मंडळांतील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांनाच तुटपुंजी मदत 

ठळक मुद्देसोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा

- मारोती जुंबडे परभणी : आॅक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते़ नुकसान झाल्याचे राज्यपाल व राज्य शासनाने मान्यही केले़ त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदतीचे वाटपही करण्यात आले; परंतु, अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळांपैकी केवळ १२ महसूल मंडळातील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ४७८ रुपयांचाच पीक विमा दिला आहे़ त्यामुळे २६ मंडळांतील शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठेंगा दाखविल्याचे समोर आले आहे़ 

२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांचा पेरा केला होता़ नैसर्गिक संकटांच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ८ लाख २१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी ४ लाख ३० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, कापूस, मूग, धान, बाजरी, ज्वारी, भात व सूर्यफूल पिकांचा विमा अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता़ यामध्ये ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी २४ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावरील उडीद पिकासाठी विमा कंपनीकडे ९३ लाख ५८ हजार ३४८ रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम भरली होती़ त्याचबरोबर ७० हजार ५७७ शेतकऱ्यांनी ३१ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाच्या विम्यापोटी ६ कौटी ८३ लाख ४३ हजार ६७५ रुपयांची विमा रक्कम कंपनीकडे वर्ग केली होती़ १ लाख ८९ हजार १३० शेतकऱ्यांनी ७५ हजार २३ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकासाठी २८ कोटी ५० लाख ८ हजार ९९८ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे वर्ग केला होता़ त्याचबरोबर सर्वाधिक ३ लाख ७ हजार ५०२ शेतकऱ्यांनी २ लाख २७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकापोटी १९ कोटी ५२ लाख ५४ हजार ५७१ रुपयांचा वाटा कंपनीकडे भरला होता़ आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील पिकांची परिस्थितीही सुस्थितीत होती़; परंतु, आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला व ३८ मंडळातील मूग व उडीद या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला़ त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची निंतात गरज असल्याचे पाहून तालुका व जिल्हा प्रशासन कामाला लागले़ जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे केले़ जिल्ह्यात १०० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला़ राज्य शासन व राज्यपालांनीही शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ८ हजारांची मदत घोषित केले़ तिचे वाटपही केले़ शासकीय मदत मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी भरलेला अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडील विमा  १०० टक्के मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ १२ मंडळातील हजार ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ८७८ रुपयांचाच विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे १२ मंडळातील शेतकऱ्यांना यावर्षीही विमा कंपनीने ठेंगाच दाखविल्याचे समोर आले आहे़ 

उडीद पिकासाठीही वगळली १२ मंडळे२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्ुारन्स कंपनीकडे आपल्या उडीद पिकाचा विमा उतरविला होता़ विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती या पिकांतून काहीच लागले नाही़ त्यामुळे १०० टक्के शेतकऱ्यांना हा विमा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ २२ मंडळातील १५ हजार ९७९ शेतकऱ्यांना २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४३ रुपयांचाच पीक विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे मुगापाठोपाठ उडीद पिकासाठी १२ मंडळातील शेतकऱ्यांना वगळले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त हाते आहे़ 

या मंडळांतील शेतकरी वंचित२०१९-२० या खरीप हंगामातील मूग पिकासाठी विमा कंपनीने गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, मानवत तालुक्यातील केकरजवळा, कोल्हा, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पालम़ परभणी तालुक्यातील दैठणा, पिंगळी, सिंगणापूऱ पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा व ताडकळस़ सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, सेलू तर सोनपेठ तालुक्यातील आवलगाव व सोनपेठ या मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाच्या विम्यातून वगळले आहे़उडीद पिकासाठी गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी सावरगाव, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, बोरी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा, ताडकळस़ सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु़, देऊळगावगात, कुपटा, सेलू, वालूर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उडीद पिकासाठी  वगळण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जparabhaniपरभणी