अध्यक्षस्थानी न.प.चे गटनेते उत्तम खंदारे हे होते तर स्वागताध्यक्षपदी ॲड. हर्षवर्धन गायकवाड यांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे उद्घाटन न्या. यशवंत चावरे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर भदंत बोधीधम्मा, भदंत पैय्यवंश, प्रा.डॉ. आदिनाथ इंगोले, माजी नगराध्यक्ष मोहन मोरे, प्रा. अशोक कांबळे, अशोक व्ही. कांबळे, ॲड. महादेव जोगदंड, जगदीश जोगदंड, नगरसेवक ॲड. धम्म जोंधळे, दादाराव पंडित, आनंद नेरलीकर, ॲड. बाळासाहेब उगले, राजकुमार सूर्यवंशी, सुनील जाधव यांची उपस्थिती होती. या सोहळ्यात बोलताना न्या. यशवंत चावरे महणाले, भारतीय संविधान हे उच्च नैतिक मूल्यांवर आधारित असून, स्वातंत्र्य, समता, विश्व बंधूत्व आणि न्यायाची अनेक तत्वे यात समाविष्ट आहेत. या तत्वानीच देशाच उद्धार होवू शकतो. त्यासाठी संविधानाची काटोकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. न्या. चावरे यांच्या हस्ते डॉ. बााबासाहेाब आंबेडकर चौकात पंचरंगी ध्वजाचे ध्वजारेाहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक गोवर्धन घुमे, श्यामराव जोगदंड यांची उपस्थिती होती. विजय सातोरे यांच्या संविधानपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. केशव जोंधळे, विजयकुमार जोंधळे, शाहीर गौतम कांबळे आदींनी प्रयत्न केले.
भारतीय संविधानात जगाला दिशा दाखविण्याचे सामर्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST