यासंदर्भात शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून ही या पुलाची दुरूस्ती केली जात नसल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या रस्त्यावर नेहमी पाणीच पाणी वाहताना दिसत आहे. हे पाणी वाया जात आहे. यातूनच शेतकऱ्यांना रस्त्यावरून जाताना व बैलगाडी नेताना कसरत करत जावे लागत आहे. या पुलाचे पाईप फुटल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. तसेच हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, जायकवाडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित रहावे लागत आहे. या पुलाची दुरूस्ती करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकरी सरपंच दुर्गादास साठे, प्रशांत कागदे, पिंटू साठे, दीपक पाटील, कांता साठे, मधुकर साठे, बाबा साठे, बळीराम साठे, रामा भडे, बाळू भडे, उत्तम डोके, माधव डोके, राजेभाऊ साठे या शेतकऱ्यांनी दुरूस्तीची मागणी केली आहे.
चारीवरील पूल फुटल्याने शेत रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST