शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी बाजार समितीत राजकीय उलथापालथ; दुर्राणींचा डाव यशस्वी, सभापतीवरील अविश्वास पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:25 IST

ठराव बहुमताने पारित झाला आणि बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांना पायउतार व्हावे लागले.

पाथरी : पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर पारित झाला असून, यामुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी टाकलेल्या डावात अखेर त्यांना यश आले आहे.

यासाठी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक सहायक निबंधक एम.ए. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. १८ पैकी १३ संचालकांनी अविश्वासच्या बाजूने, तर ५ जणांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव बहुमताने पारित झाला आणि नखाते यांना पायउतार व्हावे लागले.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे १८ पैकी १२, तर शिवसेनेचे सईद खान यांच्या गटाचे ६ संचालक निवडून आले होते. सभापतीपदी अनिल नखाते, तर उपसभापतीपदी श्याम धर्मे यांची निवड झाली होती. मात्र, त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. नखाते यांनी बाबाजानी यांना सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून बाजार समितीची राजकीय गणिते बिघडली होती. पुन्हा अचानक काँग्रेसचे सहा आणि शिंदेसेनेचे सहा संचालक एकत्र आले. त्यांनी नखातेंवर अविश्वास दाखल केला. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा यात पुढाकार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या घडामोडीत शिवसेना संचालकांनी सईद खान यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याने अधिकच चर्चा रंगली होती.

दरम्यान, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने तणाव होता. त्यामुळे पोलिसांनी बाजार समिती प्रांगणात तगडा बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि जवळपास १०० पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते.

सहलीवरून थेट आगमनसहलीवर गेलेले सर्व संचालक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आपल्या वाहनांच्या ताफ्यासह बाजार समिती प्रांगणात दाखल झाले. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे ताफ्याच्या अग्रभागी होते.

शिंदे गटाच्या गळ्यात भगवा कायमशिंदेसेनेचे सहा संचालक बैठकीसाठी येताना भगवे रुमाल गळ्यात परिधान करून आले होते. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व १३ संचालक एकत्र बाहेर पडून दुर्राणी यांच्या भेटीला गेले.

समीकरणे बदलणार?स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी घडल्याने तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बिघडून गेले आहे. कोण कोणाच्या बाजूला राहील, याचा आता नेम नसल्याने सभापती निवडीपर्यंत आणखी काय उलथापालथ होते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

शिवसेनेचा सभापती झाला तर काय फरक पडतो ?बाजार समितीवर आपण सभापतिपदावर अनिल नखाते यांना बसविले. मात्र, ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सभापती झाले होते. आता मूळ शिवसेनेचा सभापती झाला तर आपल्याला काय फरक पडतो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Political upheaval in Pathri Market Committee; Durrani's move succeeds, Chairman ousted.

Web Summary : Anil Nakhate, Chairman of Pathri Market Committee, lost a no-confidence vote. Ex-MLA Durrani orchestrated the ousting amidst shifting political alliances. Congress and Shinde Sena combined against Nakhate, triggering local political realignments before upcoming elections. Tensions were high, with heavy police presence.
टॅग्स :parabhaniपरभणी