शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक रौफ यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:04 IST

समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ यांना बुधवारी औरंगाबाद येथे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली़

ठळक मुद्देसमशेर खान खून प्रकरण खंडपीठाने फेटाळला जामीन

परभणी : समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ यांना बुधवारी औरंगाबाद येथे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली़ रौफ हे मागील दोन महिन्यांपासून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते़ बुधवारी न्यायालयाने जामीन फेटाळताच त्यांना अटक करण्यात आली़संगमनेर येथील एका वाहन चोरीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अपना कॉर्नर येथून समशेर शामीर खान यांना ताब्यात घेतले होते़ याच प्रकरणात समशेर खान यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली़ जबर मारहाणीमुळे समशेर खान हे बेशुद्ध पडले़ त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले़ परंतु, तेथे सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले़ या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते़  तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले़ चौकशीअंती तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ, जमादार तुळसीदास देशमुख आणि शेख मुश्ताक यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी तिघांनीही परभणी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला़ जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रौफ यांनी जामीनासाठी अर्ज केला होता़ मागील दोन महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होते़ २० सप्टेंबर रोजी खंडपीठाचे न्या़ व्ही़ जाधव यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली़ यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ जगतकर यांनी काम पाहिले़ न्यायालयाने रौफ यांचा जामीन फेटाळला व पोलिसांकडे स्वाधीन होण्याचे आदेश दिले़ सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर, पोलीस उपअधीक्षक पठाण यांच्यासह पोलीस निरीक्षक चव्हाण, थेटे यांच्या पथकाने रौफ यांना न्यायालयाच्या परिसरातच अटक केली़ रौफ यांना २१ सप्टेंबर रोजी परभणी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली़