शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:33 IST

विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

परभणी - विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे. 

पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी अ व ब च्या दोन चेअरमन आणि संचालकांविरुद्ध अनेक वेळा उपोषण केल्यानंतरही कारवाई होत नाही. चेअरमन, संचालकांविरुद्ध ठोस पुरावे असतानाही कारवाई होत नसल्याने रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते या चौघांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन कारवाई न झाल्यास २० फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 

या इशार्‍यानुसार मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवा मोंढा पोलीस ठाणे आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी तगडा बंदोबस्त लावला. सकाळपासूनच पोलीस कर्मचारी या भागात इशारा देणार्‍या चौघांचाही शोध घेत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते हे दोघेही रॉकेलचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी लगेच या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रॉकेलचा डबाही हिसकावून घेतला. चुडावा पोलीस ठाण्याचे शेख रफीक, एल.बी. पोकलवार, एन.ए.सुजलोड, राहुल चिंचाणे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, संतोष चाटे, कैलास बायनावाड, पी.व्ही. दीपक यांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर उर्वरित दोघांचा शोध घेण्यात आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रावण बाबाराव मोहिते आणि कैलास चंपतराव वाघ हे दोघेही पोलिसांना आढळले. मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे. 

आश्वासनानंतर प्रकरण निवळले दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांसह इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांची भेट घेतली. या प्रकरणात २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक आणि लेखाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन तोगडा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्यानंतर प्रकरण निवळले.