शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस

By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 28, 2023 16:54 IST

अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई होणार

परभणी :महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या ११ भरारी पथकाने परभणी परिमंडलात तीन दिवस वीजचोरांविरुद्ध राबविलेल्या धडक मोहिमेत ४२ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. संदिग्ध असलेल्या १४० वीज मीटरची तपासणी या मोहिमेत करण्यात आली. या वीजचोरीप्रकरणी संबंधितांना वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात येणार असून दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ११ भरारी पथकांनी नांदेड परिमंडलात परभणी व नांदेड मंडळांतर्गत २४ ते २६ एप्रिल या कालावधीत नांदेड परिमंडलात विशेष वीजचोरीविरोधी मोहीम राबवली. यामध्ये १४० वीज मीटरची तपासणी करण्यात आली असता नांदेड मंडळात ५० तर परभणी मंडळात ४२ मीटरमध्ये वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले. संबंधित वीजचोरांना अनुमानित वीजबिल दंडाच्या रक्कमेची बिले देण्यात येणार आहेत. वीजचोरीच्या अनुमानित वीजबिल दंडाची रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनधिकृत विजेचा वापर करू नयेवीजचोरी पकडण्याची मोहीम या पुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीmahavitaranमहावितरण