शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी परिहार यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:41 IST

कार्याध्यक्षपदी बोबडे, जाकेरलाला यांची नियुक्ती

परभणी- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी स्वराजसिंह परिहार यांची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी संतोष बोबडे व जाकेर खान मोईन खान ऊर्फ जाकेरलाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वतीने घेण्यात आला. 

परभणी महानगरपालिकेतील एका स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी व शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद निर्माण झाला होता. या वादात महानगरपालिकेतील १३ नगरसेवक परिहार यांच्या बाजुने गेले व त्यांनी आ.दुर्राणी यांचे समर्थक तथा मनपातील गटनेते जलालोद्दीन काजी यांचे गटनेतेपद काढून चॉंद सुभाना जाकेर खान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर अ‍ॅड. परिहार यांना शहर जिल्हाध्यक्षपदावरुन काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्वाने दूर केले होते. त्यांच्या जागी २८ फेब्रुवारी रोजी संतोष बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अ‍ॅड. परिहार यांच्या गटात असंतोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने १३ नगरसेवकांनी परिहार यांना न्याय द्यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत आपण अन्य पर्यायाचा विचार करु असा इशारा दिला होता. तसेच गत आठवड्यात राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रमुख खा.वंदना चव्हाण, उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यशाळेलाही या नगरसेवकांनी दांडी मारली होती. ही बाब पक्ष नेतृत्वाला राज्यस्तरावर कळविण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद आणखी वाढू नये, या दृष्टीकोनातून पक्षाने अ‍ॅड.परिहार यांची शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता. त्यानंतर या संदर्भातील अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये परिहार यांच्या नियुक्ती बरोबर सध्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच जाकेर खान मोईन खान ऊर्फ जाकेरलाला यांचीही शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती मिळताच परिहार यांचा परभणीत कार्यकर्त्यांनी सत्कार केला. दरम्यान, परिहार यांच्या फेरनिवडीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकparabhaniपरभणी