शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचा पारा ४३.२ अंशांवर : तापमानाबरोबरच जिल्ह्यात उकाडाही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:50 IST

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.यावर्षी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मार्च महिन्यापासूनच परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला असून तब्बल दोन महिने नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. मे महिन्यात देखील उन्हाचा पारा वाढलेलाच असून जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण मे महिना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, त्यात भर पडली ती उकाड्याची. मागील आठवड्यापासून वाढत्या तापमानाबरोबरच वातावरणात उकाडाही वाढला आहे. दिवस आणि रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमी होते आणि उकाड्यात वाढ होत असते. यावर्षी मात्र ऊन तसू भरही कमी झाले नाही. शनिवारी जिल्ह्यात ४३.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असून किमान तापमानही २७.५ अंशापर्यंत पोहचले होते. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने शनिवारी नागरिकांना प्रचंड उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यातच उकाड्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही झाली होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात कमालीची उष्णता होती. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतरही नागरिकांची घालमेल सुरुच होती.पुढील आठवडाही वाढत्या तापमानाचावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने २६ ते ३० मेपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. यात ३० मेपर्यंत परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून नागरिकांना कडक ऊन आणि उकाडा सहन करावा लागणार आहे. सध्या काही भागात तापमान वाढत असले तरी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान