शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शेतकºयांनी कापूस खरेदी पाडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:50 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी भावाने कापूस खरेदी होत असल्याच्या कारणावरुन शेतकºयांनी एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीने २७५ रुपयांनी भाव वाढवून दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी भावाने कापूस खरेदी होत असल्याच्या कारणावरुन शेतकºयांनी एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीने २७५ रुपयांनी भाव वाढवून दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली.परभणी बाजार समितीत गतवर्षी कापसाच्या खरेदी- विक्रीतून तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षीही बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १३१ गावांमधील शेतकरी आता मोंढ्यात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्यानुसार बाजार समितीच्या मार्केट यार्डात कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. व्यापाºयांकडून खरेदी सुरु झाल्यानंतर या ना त्या कारणाने कापूस खरेदी बंद होण्याच्या घटना घडत आहेत. कधी हमाल तर कधी व्यापारी संपावर जात असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक अडचणीत येत आहेत. या सर्व घटनांवर तोडगा निघाल्यानंतर शुक्रवारी बाजार समितीमध्ये कापूस उत्पादकांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला. त्यानंतर व्यापाºयांकडून खरेदीला सुरूवात झाली; परंतु कापसाला कमी भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी चांगले संतापले. यावरून खरेदीदार आणि शेतकºयांमध्ये बाचाबाची झाली. मानवत, सेलू आदी बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ५०० रुपये भाव मिळत असताना परभणीच्या बाजार समितीत मात्र केवळ ५ हजार रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे, असा आरोप शेतकºयांनी करुन एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीच्या कर्मचाºयांनी व्यापारी व शेतकºयांमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर २७५ रुपये भाव वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ५ हजार रुपयांवरुन ५ हजार २७५ रुपयांनी खरेदीस सुरुवात केली. त्यानंतर कापूस खरेदी सुरळीत सुरु झाली.बहुतांश व्यापाºयांनी खरेदीकडे फिरवली पाठ; मोजकेच व्यापारी लिलावातपरभणी बाजार समितीच्या मार्केट यार्डात कापूस खरेदी करण्यासाठी १४ खरेदीदार आहेत. यामध्ये ओंकार जिनिंग, महेश जिनिंग, दुर्गेश्वरी जिनिंग, बालाजी जिनिंग, सत्यप्रयाग जिनिंग, राज राजेश्वर जिनिंग, अरिहंत फायबर्स, दीपस्तंभ जिनिंग, व्यंकटेश जिनिंग, ओंकार क्वॉटन, सक्सेस क्वॉटन, श्री गणेश अ‍ॅग्रो आदी १४ जिनिंगची नोंदणी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदीदार व्यापाºयांनी मार्केटमधील कापूस खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. शुक्रवारी तर १४ पैकी केवळ तीनच खरेदीदारांच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरु होती. त्यामुळे परभणी बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणलेल्या कापूस उत्पादकांची कोंडी होत आहे. त्यामुळे याकडे कृउबाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन खरेदीदार वाढवावेत, अशी मागणी कापूस उत्पादकांमधून होत आहे.‘ई-नाम’ प्रणालीमुळे आॅनलाईन व्यवहार वाढले४परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम प्रणाली अंतर्गत निवड झाली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात जो माल खरेदी- विक्री केला जाईल, त्याची सर्व देयके धनादेश, आरटीजीएसच्या माध्यमातून अदा करावयाची आहेत; परंतु, बहुतांश शेतकºयांना माल विक्री केल्यानंतर नगदी स्वरुपात देयकाची गरज असते. मात्र परभणी बाजार समितीत नगदी व्यवहार करणे कठीण झाले आहे. परिणामी कापूस उत्पादक, मानवत, सेलू, बोरी, पूर्णा या बाजार समितीकडे वळत आहेत. त्यामुळे बाजार समितीत कापसाची आवक दुपट्टीने घटली आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.