शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सिंचन परिषदेचा समारोप:मागणी, पुरवठा पाहून उत्पादन करा- दि.मा. मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:20 IST

पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात सुरु असलेल्या दोन दिवसीय सिंचन परिषदेचा रविवारी समारोप झाला. अध्यक्षीय अभिभाषणात मोरे बोलत होते. यावेळी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.संध्याताई दुधगावकर, बापु अडकिणे, प्रा.पी.ए. ठोंबरे यांची उपस्थिती होती.डॉ.मोरे म्हणाले, सिंचन, पाणी व्यवस्थापन, पीक पाणी, जोड धंदे याचा मेळ लावून शेतकºयांनी शेती केली पाहिजे. केवळ शेती करुन कोणताही देश प्रगती करु शकत नाही. तेव्हा शेतीशी निगडित उद्योग, व्यवसायाची जोड घेणे गरजेचे आहे. करपरा प्रकल्प काही इंचानी वाढविला तरी २ हजार ऐवजी ६ हजार हेक्टर क्षेत्र भिजवणीखाली येऊ शकते, असे ते म्हणाले.या परिषदेच्या पहिल्या सत्रात विजयअण्णा बोराडे यांनी सिंचनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला. दुसºया सत्रात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी जमिनीतील, वातावरणातील ओलावा टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या.रा. जाधव, डॉ. भगवानराव कापसे यांचेही भाषण झाले. डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी सत्राचा अध्यक्षीय समारोप केला. प्रा.डॉ.भीमराव खाडे यांनी आभार मानले. तिसºया सत्रात ग्रामसफाई अभियानाचे माधवराव पाटील शेळगावकर, व्ही.एम. रानडे, निवृत्त कार्यकारी अभियंता सावळेश्वरकर, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा.ब. घोटे, महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरण पाणीवाटप व्यवस्थापनाचे सचिव डॉ.सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात डॉ.पी.ए. ठोंबरे, डॉ.अनिल बुलबुले, छत्रपती मानवते आदींनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. परिषदेमध्ये प्रा.हरिश्चंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आडे यांनी केले. या परिषदेस शेतकरी, शेतमजूर, विषय तज्ज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.