शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

परभणीत ‘समृद्ध महाराष्ट्र’ योजनेला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़२०१६ पूर्वी जिल्ह्यात सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती़ केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी विहीर, शेततळे व सिंचनाच्या सुविधांचे कामे या योजनेंतर्गत करण्यात येत होते़ परंतु, अनेक ठिकाणची कामे ठप्प पडली होती़ सिंचनाची कामे झाली नसल्याने ३ वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला़ हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे शेतकºयांवर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली़या योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी व्हर्मी कम्पोस्टिंग, भू-संजिवनी नाडेप कम्पोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौचखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा समावेश केला़ हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यासाठी उद्दिष्टही देण्यात आले. परभणी तालुक्याला अहिल्यादेवी सिंचन योजनेंतर्गत ४ हजार ५०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार ४ हजार ३४ लाभार्थी ग्रामसभेतून निवडण्यात आले़ ११६४ लाभार्थ्यांच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली़ ७११ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली़ ५७१ विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले़ यातील केवळ १४० विहिरींची कामे प्रत्यक्षात सुरू झाली़ मात्र एका वर्षात केवळ २१ कामे पूर्ण झाली आहेत. गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, सेलू या आठ तालुक्यांत एकही काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही़ ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्राधान्याने राबवावा, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष करीत या योजनेतील कामांना एक प्रकारे खो दिल्याचेच दिसून येते़