शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

परभणी जि़प़ सदस्याचा पं.स. मध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:46 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ऐकून घेत नसल्याने संतप्त झालेल्या जि.प. सदस्य किशनराव भोसले यांनी ३ आॅगस्ट रोजी दुपारी पंचायत समिती कार्यालयातील सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक करून आपला राग व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ऐकून घेत नसल्याने संतप्त झालेल्या जि.प. सदस्य किशनराव भोसले यांनी ३ आॅगस्ट रोजी दुपारी पंचायत समिती कार्यालयातील सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक करून आपला राग व्यक्त केला.अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर करण्यासाठी व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राचे ग्रामसेवक नुतनीकरण करून देण्यासाठी अडचण निर्माण करीत असल्याने ३ आॅगस्ट रोजी गंगाखेड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सुरू असतांना ईसाद गटातील रासपाचे जिल्हा जि़प़ सदस्य किशनराव भोसले हे ग्रामसेवकाकडून गवंडी कामगारांना होत असलेली अडचण सांगण्यासाठी काही गवंडी कामगारांसह गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्याकडे पंचायत समिती कार्यालयात आले. पंचायत समितीच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असल्याने ते गटविकास अधिकारी यांच्या दालनात थांबले असताना दुपारी अंदाजे २ वाजेच्या सुमारास सभा संपल्यानंतर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर हे त्यांना न भेटताच एका उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्याने बराच वेळ त्यांची वाट पाहून संतप्त झालेल्या किशनराव भोसले यांनी प्रथम गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्च्या आणून बाहेर फेकल्या व त्यानंतर सभापती तसेच उपसभापतींच्या दालनातील खुर्च्या बाहेर फेकून देत आपला राग व्यक्त केला.पंचायत समिती कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेक होत असल्याची माहिती समजताच गंगाखेड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी मोठा फौजफाटा घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठल्याने पंचायत समिती कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. खुर्च्यांची फेकाफेक झाल्यानंतर कार्यालयात आलेल्या गटविकास अधिकारी सुरडकर यांनी याबाबतची तक्रार द्यावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात थांबलेले असताना वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार दाखल करतो म्हणत झाल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना देतांना खुर्च्यांची फेकाफेकी करणारे किशनराव भोसले हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी असे काही कृत्य केले नव्हते आज भावनेच्या भरात त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी केल्याचे सांगितल्याने झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा अशा सूचना वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्याने हा अहवाल सादर करून वरिष्ठांच्या सूचनानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगत गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी कार्यवाहीचा चेंडू वरिष्ठांकडे टोलवित झालेल्या प्रकरणावर पडदा टाकल्याने पंचायत समिती परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते.दिलगिरी व्यक्त करीत सभागृहाची माफी मागितली४ग्रामीण भागातील माझ्या गटातील काही गवंडी कामगारांचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवक अडचण निर्माण करीत असल्याने याबाबत गटविकास अधिकारी सुरडकर यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढावा व प्रमाणपत्र नूतनीकरण अभावी गवंडी कामगार शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी पंचायत समिती कार्यालयात आलो असताना समर्पक असे उत्तर न मिळाल्याने माझा राग अनावर झाला.४भावनेच्या भरात मी खुर्च्यांची फेकाफेक केल्याचे सांगत हे पंचायत समितीत रासपाची सत्ता असल्याने हे सभागृह आमच्या पक्षाचे आहे. खुर्च्यांची फेकाफेकी झाल्यानंतर गवंडी कामगारांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी चार दिवसांचा अवधी वाढून मिळाल्याने आज झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागत झालेली नुकसान भरपाई देण्याचे लेखी दिल्याचे किशनराव भोसले यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती