शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:18 IST

शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परभणी शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका घरात चार ते पाच जणांनी एका व्यक्तीचा खून केला होता.खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह आॅटोमध्ये नेऊन धाररोडवरील मनपाच्या डपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यात जाळून टाकला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेसपासून आरोपी विकास विलास भालेराव (२०) हा फरार होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी भागातून आरोपीस शिताफीने स्थागुशाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला परभणीत नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व स्थागुशाचे पोलीस अधीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवाजी देवकते, पोह.हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धूतराज, गणेश कौटकर, राजेश आगासे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनCrime Newsगुन्हेगारी