शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्टÑीय महामार्गाचे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:51 IST

परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्टेशन ते परभणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्यानंतरही ही कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरू लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्टेशन ते परभणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्यानंतरही ही कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरू लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.राष्टÑीय महामार्ग २२२ हा कल्याण ते निर्मल तयार होत आहे. बीड जिल्ह्यातील गढी फाटा ते माजलगाव- पाथरी- मानवतरोड रेल्वेस्टेशनपर्यंत रस्त्याचे काम एल अ‍ॅन्ड टी कंपनीने जवळपास पूर्ण केले आहे; परंतु, या रस्त्यावर असलेल्या ढालेगाव येथील गोदावरीच्या पात्रातील पूल आणि मानवतरोड रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. सेलू कॉर्नर परिसरातील दुभाजकाचे कामही संथ गतीने सुरू आहे. पाथरी ते परभणी हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता आहे. पाथरीपासून मानवतरोड रेल्वेस्टेशनपर्यंत १७ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. मात्र मानवतरोड रेल्वेस्टेशनपासून परभणी शहरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे मानवतरोड ते परभणीपर्यंतच्या रस्त्याच्या कडेला खोदकाम करून काही ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. तर काही ठिकाणी खोदकाम करून भराव टाकण्यात आला नसल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे छोट्या-अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या कंत्राटदाराने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याच्या कामाची गती वाढविण्यास संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा