शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : १३ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे पूर्ण होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.पैठण ते बाभळीपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रात बारा उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००६ मध्ये राज्य शासनाने हाती घेतला होता. ढालेगाव, मुदगल या दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तारुगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मान्यता मिळाली. तारुगव्हाण बंधाºयास १२३ कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या बंधाºयाचे काम सुरू करण्यात आले. या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया गोदाकाठच्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील २१०० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले असते; परंतु तसे झाले नाही. या बंधाºयाची पाणी क्षमता १५.४० दलघमी एवढी आहे.तारूगव्हाण बंधाºयाचे काम मागील अकरा वर्षे संथ गतीने करण्यात आले. शासनाकडून त्यासाठी वेळेत निधीही उपलब्ध करून देण्यात आला नाही. आता १३ वर्षानंतरही बंधाºयाचे काम पूर्ण होऊन बंधाºयात पाणी अडविण्याचे नियोजन झाले नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाºयांत ६० कि.मी.चे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही बंधारे भरले तरी मधल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात पाणी साचत नसल्याने या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तारूगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मंजुरी देऊन गती देण्यात आली आहे; परंतु, कंत्राटदाराच्या उदासिन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम १३ वर्षानंतरही सुरूच आहे. बंधाºयासाठी १७ गेट बसविले जाणार आहेत. त्यासाठी १३ वर्षात फाऊंडेशन पूर्ण झाले आहे.या वर्षात गेट बसविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला खरा. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने ते शक्य झाले नाही. जून महिन्यात माजलगाव भागातील शेतकºयांनी बंधारा पात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंत दरवाजे टाकण्याचे काम सुरू करून दरवाजे बसविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु, अद्याप दरवाजेही बसविण्यात आले नाहीत. दरवाजे उचलण्यासाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या वर्षात पाणी अडविण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत.३३ कोटी रुपयांची वाढली किंमततारूगव्हाण परिसरातील शेतकºयांना पाणी उपलब्ध होऊन सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने तारूगव्हाण येथील बंधाºयाला मंजुरी दिली. तेव्हा या बंधाºयाची मूळ किंमत १२३ कोटी रुपये होती. मात्र वेळेत निधीही मिळाला नाही आणि कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे १३ वर्षात बाजारभावाप्रमाणे बंधाºयाची किंमत ३३ कोटी रुपयांनी वाढली गेली आहे. ७० टक्के काम झाले असून त्यावर १०२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणीही केली आहे.-आ. मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी