शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:04 IST

दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.मागील एक ते दोन वर्षापासून हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरातील मुलांमध्ये व्यसन पहावयास मिळत आहे. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत व्हाईटनर मिळत आहे. मुळात याचा उपयोग चुकीने लिहिलेला मजकूर मिटविण्यासाठी केला जातो. मात्र हल्ली हे व्यसनाचे साधन बनले आहे. विशेषत: शहरातील किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपरीवरून व्हाईटनर सर्रास विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. हे व्हाईटनर कोणास द्यावे, याचे निर्बंध नसल्याने ८ वर्षापासून ते १८ वर्षा पर्यतचे विद्यार्थी सहजतेने मिळवितात. ही नशा एवढी गंभीर आहे की, एकदा व्यसन लागले की, सुटत नाही. नशा केली नाही तर ती व्यक्ती बैचेन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरात शाळा व महाविद्यालये आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. नशा करणारे २०० विद्यार्थी शहरात सापडतील. हे विद्यार्थी शाळाबाह्य बनले आहेत. पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून नशा केली जाते. नशेबरोबरच सिगारेट, गुटखा व दारूच्या नशेकडेही हे विद्यार्थी वळत आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्याच बरोबर पॉकेट मारणे, मारहाण करणे, मुलींची छेडछाड हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात तसेच मोकळ्या मैदानात सर्रास वावरताना दिसून येतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन व्हाईटनरच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.व्हाईटनर शरीरात पोहोचल्यानंतर शरीर बधीर करते. त्यानंतर वेडेपणा, स्मृतिभ्रंश, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी व्हाईटरनरची नशा आहे. एकदा वास घेतल्यानंतर तो वेळोवेळी घ्यावासा वाटतो. चरस, गांजा, अफू जेवढे घातक आहेत. तेवढाच व्हाईटनरचा वास सुद्धा घातक आहे.-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बालरोग तज्ज्ञ, जिंतूरमुलांवर संस्कार हे आई-वडिलांकडून होणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनही दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात वेगवेगळ्या नशेबद्दल जनजागृती करीत आहे. नशेपासून विद्यार्थी दूर राहण्यासाठी अधिक प्रभावीपणे जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.-सुरेश नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थी