शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:32 IST

तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.शहराला डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी येलदरी जलाशयातून ०.५ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. पूर्णा बंधाºयापर्यंत हे पाणी पूर्ण क्षमतेने पोंहचले नाही. शिवाय या पाणलोट क्षेत्रातून कृषीपंपद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. त्याचबरोबर बंधारा नादुरुस्त असल्याने पाण्याचा दरवेळी मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मागील महिन्यात आलेले पाणी पूर्णपणे संपले आहे. मागील दहा दिवसांपासून पूर्णा शहरातील नागरिक पाणी टंचाईस तोड देत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास बराच अवधी असताना शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा परिसरात खोलगट भागात काही प्रमाणात पाणी साठा साचतो, जो नगरपालिकेच्या पंपापर्यंत पोहचू शकत नाही. या खोलगट भागातील पाणी उपसा करणाºया पंपापर्यंत पोहचविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे नाला काढण्यात आला आहे. गुरुवारी या कामास सुरुवात झाली असून पाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु हे पाणी केवळ आठवडाभरापर्यंत पुरणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाण्याची मागणी करण्यात आली असून पाणी पुरवठ्यासाठी १ दलघमी पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. पाण्यासाठी न.प.प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी ते तोडके पडत आहेत. १ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागात नळाला पाणी आले आहे; परंतु, अजूनही नवीन वसाहती पर्यंत हे पाणी पोहचू शकले नाही. पाण्याअभावी अतिरिक्त पाणी पुरवठा करणाºया यंत्रणा ही बंद पडल्या आहेत.हातपंपाची : पाणीपातळी घटलीशहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी हातपंप आहेत; परंतु, यातील काही हातपंप दुरुस्ती अभावी नादुरुस्त आहेत. तर बहुतांश हातपपांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा, पाण्याचा अवैध उपसा या बाबीमुळे पूर्णा शहराला वारंवार पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई