शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
5
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
6
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
7
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
8
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
9
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
10
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
11
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
12
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
13
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
14
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
15
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
16
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
17
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
18
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
19
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
20
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:59 IST

तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ): तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील गावांसह गोदावरी काठावर असलेल्या गावांनाही आॅक्टोबर महिन्या अखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. नोव्हेंबर २०१८ या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहणाचे ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली होती. भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव शे., डोंगरजवळा, गोदावरी तांडा, पांगरी, मरगीळवाडी, वाघदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कर्लेवाडी, उंबरवाडी, देवकतवाडी, चिम्मा नाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव आदी २५ गावांतील ३३ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रस्ताव हे तहसील कार्यालयांतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे अंतिम आदेशाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. यात डोंगरगाव शे., पांगरी, नरळद, मरगीळवाडी, वागदेवाडी, उंडेगाव, सिरसम, ढवळकेवाडी, देवकतवाडी आदी १४ गावात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांना तहसील प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित १३ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. संबंधित गावच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर विविध गावातील या १३ प्रस्तावांना विहीर, बोअर अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर या १३ प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर हे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या लालफितीत महिन- महिना मंजुरी अभावी पडून राहत असल्याने बहुतांश गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावरच पाण्याचे नियोजन करुन तातडीने गावकºयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने व तालुका प्रशासनाने तातडीने अधिग्रहणासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांतून होत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलकडे४तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई नियोजनाचे ठरावासह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त आहेत. अधिग्रहणासाठीचे हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तहसीलकडे सादर केले आहेत. तहसीलदारांच्या आदेशाने अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देत असल्याचे पं.स. पाणीपुरवठा विभागातील बोबडे यांनी सांगितले.मंडळ अधिकाºयांच्या अहवालानंतर मंजुरी४पंचायत समिती कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या विहीर, बोअर, अधिग्रहणाच्या प्रस्तावांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निकषाच्या आधीन राहत तलाठी, मंडळ अधिकाºयामार्फत पंचनामा करुन त्यांचा अहवाल कार्यालयास प्राप्त होतो. त्यानंतरच अधिग्रहणाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आदेश दिला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे अव्वल कारकून रघुराज जाधव यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई