शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शहरात पाण्याच्या विक्रीत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:07 IST

जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दररोज सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दररोज सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़परभणी शहरात दरवर्षी उन्हाळ्यात विकतच्या पाण्याचा व्यवसाय तेजीत असतो़ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नियमित पाणी मिळत नसल्याने आणि भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते़ ही दरवर्षी निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन व्यावसायिकही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करतात़ यावर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ तयामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचे वेध लागले होते़ मात्र मध्यंतरीच्या काळात थंडी वाढल्याने नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही़ आठवडाभरापासून ऊन वाढत चालले असून, आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे़ तसेच शहरातील हातपंपाची पाणी पातळी घटत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ महानगरपालिकेच्या नळ योजनेद्वारे १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, मिळालेले पाणी १५ दिवस पुरविणे शक्य नसल्याने नाईलाजाने पाणी विकत घ्यावे लागते़शहरामध्ये सुमारे १५० पाण्याचे प्लँट आहेत़ या व्यावसायिकांकडे सरासरी १०० ग्राहक आहेत़ या ग्राहकांना दररोज २० लिटर पाण्याची एक बाटली लागते़ २० रुपयांना या बॉटलची विक्री होत असून, या माध्यमातून दिवसाकाठी सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़ आतापर्यंत या व्यावसायिकांकडे पाण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या निम्म्यावर होती़ मात्र मागील आठवडाभरापासून जारचे पाणी मागणी करणारे ग्राहक वाढले आहेत़उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाणी प्रश्न सतावणार आहे़ या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी देखील तयारी सुरू केली आहे़ त्यामुळे येत्या काळामध्ये पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे़रेल्वेस्थानकावर पाण्याची विक्री४विकतच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील रेल्वेस्थानक परिसरातही लघु व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जारचे पाणी उपलब्ध करून दिले आहे़ स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर बसून हे व्यावसायिक पाण्याची विक्री करतात़ थंड पाण्याचे २० लिटरचे एक कॅन ३० रुपयांना विक्री होते़ स्थानक परिसरामध्ये १ लिटरची बाटली ५ रुपयांना विक्री केली जात आहे़४एका कॅनमध्ये साधारणत: १८ ते २० बाटल्यांची विक्री होते़ यातून या कॅनमागे १० ते २० रुपयांचा नफा हे व्यावसायिक कमावतात़ सद्यस्थितीला दिवसाकाठी २० लिटरच्या सहा कॅन विक्री होत असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले़ आगामी काळात या विक्रीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.वाहन, कर्मचाºयांची वाढविली संख्याविकतच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यावसायिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत वेळेत पाण्याचे जार पोहचविण्यासाठी वाहनांची संख्या वाढविली आहे़ तसेच अतिरिक्त कर्मचाºयांचीही नियुक्ती केली आहे़ त्याचप्रमाणे पाणी भरण्यासाठी लागणाºया जारचीही खरेदी सुरू केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी