शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:01 IST

गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.पाथरी तालुक्यातील बहुतांश भाग हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकºयांच्या हातची गेली आहेत.रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र त्यानंतर ज्वारी, हरभरा, गहू आणि ऊस या पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे पाथरी तालुक्यात रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवासांपासून शेतकºयांकडून करण्यात येत होती. स्थानिक आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाणी सोडावे, असा अग्रह धरला होता.मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी एक पाणीपाळी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २३ जानेवारी रोजी धरणातून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या मुख्य कालव्यात कमी वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची गती संथ राहिली. त्यातच १ फेब्रुवारी रोजी जायकवाडी धरणाच्या मुुख्य कालव्यात देवनांद्रा जवळ ४४६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.सध्या पाथरी उपविभागात शाखा कालवा बी-५९ हातगाव वितरिकेवर १५२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी आणि मानवत तालुक्यातील ६ शाखांमध्ये ३ हजार ५०० हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यातच हे पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व उसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.पाणीपातळीतही होणार वाढपाथरी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे बहुतांश गावातील विहीर, बोअर, हातपंप कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाला स्त्रोतांचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे; परंतु, पाटबंधारे विभागाच्या वतीने जायकवाडी धरणाच्या मुख्य कालव्यात ४४६ क्युसेसने पाणी सोडले आहे. हे पाणी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास एक महिना राहणार आहे.४या कालव्याच्या पाण्यामुळे शेतातील सिंचन विहिरींसह गाव परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जायकवाडीच्या या पाण्यामुळे काही अंशी सिंचनाबरोबरच पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाथरी भागात दाखल झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पाळी सुरू राहणार आहे.-दिवाकर खारकर, उपअभियंता जायकवाडी, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी