शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

परभणी : नळांपर्यंत पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:53 IST

येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजेनेतून परभणी शहरात उभारलेली पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतर पूर्णत्वाला गेली आहे. या योजनेवर नागरिकांनी नळ जोडणी घेतल्यानंतर शहराल पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र महिनाभरापासून नळ जोडणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे.मनपा प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. साधारणत: ८०० ते ९०० अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. मात्र नवीन नळ जोडणीचा आकडा १५ ते २० पर्यंतच पोहचला आहे. शहरवासियांनी नळ जोडणीसाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने रविवारी मनपाने दर्गारोड भागातील अनेक वसाहतींना नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला.थेट येलदरी येथून जलवाहिनीद्वारे आलेले पाणी नागरिकांच्या नळापर्यंत पोहचती करण्यात आले. या माध्यमातून मनपाने जलवाहिनीची चाचणीही घेतली आणि नागरिकांना नियमित, मूबलक पाणी मिळणार असल्याची शाश्वती दिली आहे. रविवारी दर्गारोड परिसरातील वसाहतींबरोबरच गंगाखेड रोडवरील अनेक वसाहतींमध्ये या योजनेचे पाणी पोहचती करण्यात आले. त्यामुळे आता नव्या योेजनेवर नळ जोडणी घेण्यास पुढाकार घेतील, अशी अपेक्षा मनपा प्रशासनाला आहे.सद्यस्थिती : २० दिवसांतून एक वेळा पाणी४शहरात सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या योजनेची जलवाहिनी कुचकामी ठरत आहे. पाण्याचा दाब सहन न झाल्याने ती जागोजागी फुटत असून पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.४नागरिकांचा पाणीपुरवठ्यासंदर्भातील अनुभव फारसा चांगला नाही. त्याचाही परिणाम नळ जोडणीवर होत आहे. नियमित आणि दररोज पाणीपुरवठा होईल का, याची शाश्वती नसल्यानेच नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे मनपाने दोन दिवसांपूर्वी नळांना पाणी सोडून चाचणी घेण्याबरोबरच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.महिनाभरापासून जलकुंभात पाणी४युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात १६ नवीन जलकुंभ वाढले आहेत. महिनाभरापूर्वी येलदरी येथील पाणी जलकुंभात येऊन पोहचले आहे. जलकुंभांची चाचणीही पूर्ण झाली आहे.४नागरिकांनी पुरेशा प्रमाणात नळ जोडणी घेतल्यानंतर त्या त्या झोनवरुन नवीन योजनेचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नळ जोडणी आणि जुन्या नळधारकांची जोडणी अधिकृत करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी