शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:52 IST

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच लाभ होतो. मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अवर्षण परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडी प्रकल्पातच पुरेसा पाणीसाठा जमा झाला नव्हता. परिणामी परभणीकरांनाही हे पाणी मिळाले नाही. मागील वर्षीचा अपवाद वगळता त्यापूर्वी सुमारे पाच वर्षे या कालव्यातून पाणीच वाहिले नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच शाखा कालवे आणि वितरिकांची दुरवस्था झाली. यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला. त्यामुळे जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळणार, हे जवळपास निश्चित होते. शेतकरी व राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला रबी हंगामाच्या चार पाणीपाळ्याही मंजूर झाल्या आहेत. पहिली पाणी पाळी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातून वाहणाºया कालव्याची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र दुरुस्तीसाठी मुबलक निधी नसल्याने ही कामे झाली नाहीत. परिणामी तात्पुरती डागडुजी करुनच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मुख्य कालव्यांसह उपकालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती तर पाण्याची वहन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकºयांना झाला असता. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात या कालव्याचे बांधकाम झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी फरशी फुटली आहे तर काही ठिकाणी पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कालव्यांचे आयुष्यमान वाढवायचे असेल तर दुरुस्ती, देखभालीसाठीही निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.सिंचनातील अडथळेशासकीय यंत्रे वापरणे शक्य४परभणी जिल्ह्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या इतर विभागात असलेली यंत्रे, मशिनरी वेळीच उपलब्ध करुन दिली तर योग्य वेळी आणि नियमित कालव्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे. निधी नसला तरी आवश्यक ती शासकीय मशिनरी आणि यंत्रणा वापरली तर दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांत समन्वय वाढवून शासकीय मशिनरीच्या साह्याने दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे.गाळ काढला... भरावही केला...४जायकवाडी कालव्याचे पाणी जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांमधील गाळ उपसून घेतला आहे. आवश्यक त्या ठिकाणी भरावही टाकला आहे. पाथरी, मानवत, दैठणा, लोहगाव आणि परभणी या विभागांमध्ये दुरुस्तीची कामे केली आहेत. १७ जेसबी मशीन, दोन टिप्पर, ३ डोजर या मशिनरींच्या साह्याने कामे झाली आहेत. यापुढेही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली.