शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस

By राजन मगरुळकर | Updated: September 8, 2022 12:52 IST

परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता.

परभणी : शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटात एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास सुरू झालेला पाऊस साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता. कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार शहरात दोन तासात ७४ मिमी पाऊस झाला. 

परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. दहा ते पंधरा दिवसात पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पाऊस पडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही लागली होती. बुधवारी मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि गडगडाटामध्ये हा पाऊस सुरू झाला. जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, परभणी शहरात या पावसामुळे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

एका दिवसात ५.६ मिमी पाऊस  जिल्ह्यात गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.६ मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये परभणी तालुक्यात १८.४, गंगाखेड शुन्य, पाथरी ७.२, जिंतूर ०.६, पूर्णा तीन, पालम शून्य, सेलू शून्य, सोनपेठ १.९, मानवत तालुक्यात १३.३ पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने घेतलेल्या नोंदीनुसार परभणी शहरात गुरुवारी सकाळपर्यंत तब्बल ७४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी