शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

परभणी : डिजीटल सातबारांसाठी महिनाभराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:22 IST

शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना डिजीटल साईन सातबारा उपलब्ध होणार आहेत़

परभणी : डिजीटल सातबारांसाठी महिनाभराची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना डिजीटल साईन सातबारा उपलब्ध होणार आहेत़गाव पातळीवर सातबारा, फेरफार, होल्डींग ही महत्त्वाची कागदपत्रे तलाठ्यांमार्फत वितरित केली जातात़ मागील काही महिन्यांपासून सातबारा, फेरफार या कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे़आतापर्यंत २ लाख २२ हजार शेतकºयांचे सातबारांचे संगणकीकरण करण्यात आले आहे़ त्यामुळे या सातबारा शेतकºयांना थेट आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत़ शासनाच्या महाभूलेख या संकेतस्थळावर सध्या या सातबारा उपलब्ध असल्या तरी शासकीय कामकाजासाठी तलाठ्यांची डिजीटल स्वाक्षरी असलेली डीएसपी सातबारा अद्याप उपलब्ध झाली नाही़ डिजीटल साईन सातबारा करण्याचे काम मागील काही दिवसांपासून हाती घेण्यात आले असून, ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे़सद्यस्थितीत शेतकºयांना त्यांची सातबारा शासकीय कामासाठी घ्यावयाची असल्यास तलाठ्यांशी संपर्क साधून घ्यावी लागणार आहे़; परंतु, डिजीटल साईनचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर मात्र आॅनलाईन मोबाईलवरूनही शेतकरी स्वत:ची सातबारा घेऊ शकणार आहेत़ सद्यस्थितीत शेतकºयांची अडचण होऊ नये, यासाठी प्रत्येक तलाठ्यांना डीडीएम हे सॉफ्टवेअर देण्यात आले असून, या माध्यमातून डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून दिली जात आहे़ मात्र येत्या काही दिवसांमध्ये आॅनलाईन सातबारा मिळणार आहे़खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे़ या हंगामासाठी पीक कर्ज घेण्याची प्रक्रियाही काही दिवसांतच सुरू होणार असल्याने शेतकºयांना डिजीटल साईन सातबाराची आवश्यकता निर्माण होणार आहे़ ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे़परभणीचा डाटा आता क्लाऊडवरच्शेतकºयांच्या सातबारा, फेरफार ही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा डाटा पूर्वी स्टेट डाटा सेंटरवर जमा करण्यात आला होता; परंतु, आॅनलाईन जागेची अडचण भासत असल्याने शासनाने परभणी, यवतमाळ, नांदेड, जालना अशा मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळांच्या जिल्ह्यांसाठी नॅशनल डाटा सेंटरवर जागा उपलब्ध करून दिली होती़च्संकेतस्थळावरी ही जागाही अपुरी पडत असल्याने काही दिवसांपूर्वीच सर्व जिल्ह्यांचा महसुली डाटा क्लाऊडवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ क्लाऊडमध्ये अमर्याद जागा उपलब्ध असून, राज्यातील ३१ जिल्ह्यांचा डाटा या क्लाऊडवर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे़च्परभणी जिल्ह्याचा डाटाही क्लाऊडवर हलविला जात असून १७ एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे़ आठवडाभरात संपूर्ण डाटा क्लाऊडवर शिफ्ट होणार असल्याने जागेचा प्रश्न सुटणार आहे़ याशिवाय सातबारा काढण्यासाठी येणाºया तांत्रिक अडचणीही दूर होणार आहेत़आॅनलाईन होणार नोंदीच्जिल्ह्यातील सातबारा, फेरफारचे संगणकीकरण झाल्याने कामांना गती येणार आहे़च्जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर त्या जमिनीचा फेरफार काढण्यासाठी खरेदीदारास तलाठ्यांकडे जावे लागत होते़च्आॅनलाईन कामे होणार असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर आॅनलाईन फेरफारमध्येही बदल केला जाणार असून, कामांमध्ये गती येणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdigitalडिजिटलRevenue Departmentमहसूल विभाग