शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:29 AM

महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीजपुरवठा मिळावा, या उदात्त हेतुने २०१२ मध्ये महावितरण आपल्या दारी ही योजना वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात आली़ महावितरणच्या १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी वीज जोडणीसाठी अर्ज करताच त्यांचा अर्ज मंजूर करून वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने केले होते. प्रत्यक्षात केवळ कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी उदासिनता दाखविली़ या योजनेत सहभागी शेतकºयांनी मुख्य खांबापासून आपल्या कृषीपंपापर्यंत लागणाºया केबलचा खर्च स्वत: उचलून तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे़परभणी जिल्ह्यात ४ वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत कृषीपंपासाठी वीज मिळावी म्हणून अर्ज केले होते़ या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर करून प्रती शेतकरी अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरून घेतले होते़त्यामुळे या योजनेतून साधारणत: ५ कोटी रुपयांचा निधी महावितरणच्या खात्यावर जमा झाला़ मात्र वीज जोडणी घेण्यासाठी शेतकºयांना कोणतेही साहित्य न दिल्यामुळे मागील पाच वर्षापासून कृषीपंप धारकांना वीज जोडणी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमधून महावितरणच्या कारभाराविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़इतर योजनेतून लाभ दिल्याचा कांगावाच्महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत परभणी शहर वगळता १० उपविभागांतर्गत ८ हजार ३७३ कृषीपंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला होता़ यामध्ये गंगाखेड उपविभागांतर्गत ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८३, सोनपेठ ५१३, पालम ५४६ आणि मानवत उपविभागांतर्गत ४११ लाभार्थी शेतकºयांनी या योजनेत प्रस्ताव दाखल केले होते़च्पाच वर्षानंतर वीज वितरण कंपनीने या शेतकºयांना कोणतेही साहित्य दिले नाही़ उलट हे लाभार्थी शेतकरी पाच वर्षापासून महावितरणकडे साहित्य मिळावे यासाठी खेटे मारत आहेत़ मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना व उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली आहे़च्या योजनेतून महावितरण आपल्या दारीमधील लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़ परंतु, या योजनेत लाभ घेण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड या शेतकºयांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकºयांनी या दोन्ही योजनेकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी