शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:28 IST

प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़परभणी शहरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष इंजिनिरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्टचर, हॉटेल व्यवस्थापन, पॉलिटेक्नीक आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन प्रवेशाचे केंद्र आहे़ मंगळवारी सकाळी ११ पासून येथील इंटरनेट कनेक्शन बंद पडल्याने यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांची एकच तारांबळ उडाली़ दिवसभर या संदर्भात प्रयत्न करूनही नेट सुरू झाले नाही़ त्यामुळे पालक, विद्यार्थी ताटकळत बसले होते़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम नांदेडहून असल्याने नेट बंद असल्याचे बीएसएनलएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे येथील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख प्रा़ उत्कर्ष गडदे यांनी सांगितले़ २६ जून हा प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे़ २५ जून रोजी दिवसभर ही प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेवटच्या एका दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातून विद्यार्थी शेवटच्या दिवशी आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करणार असल्याने सदरील सर्व्हरवर लोड येऊ शकतो़ परिणामी प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होवू शकतो, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे़ त्यामुळे यासाठीच्या कालावधीत वाढ करावी, अशी मागणी पालक- विद्यार्थ्यांमधून होत आहे़गेल्या आठवड्यातही बंद पडली होती प्रक्रिया४व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गोंधळाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे़ १८ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील तीन दिवस सर्व्हर डाऊनमुळे बंद पडली होती़ त्यानंतर २४ जूनपासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने अर्ज दाखल केले होते, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागत आहे.४पूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हित रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुकतांनी दिले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटEducation Sectorशिक्षण क्षेत्र