शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : श्री विसर्जनासाठी जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:22 IST

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़परभणी शहरात महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात श्री विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आला असून, गणेश मंडळांनी या ठिकाणीच श्रींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून, शनिवारी ठिक ठिकाणी पथसंचलन करण्यात आले़ १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्हाभरात श्रीगणरायांचे थाटात आगमन झाले़जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ या काळात पोलीस प्रशासनाने नियोजन करीत कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राखले.दहा दिवसांच्या या उत्सवाची रविवारी सांगता होत असून, गणरायाला निरोप देताना गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ शनिवारपासूनच श्री विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी ठिक ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले़ परभणी शहरामध्ये श्री विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे़ येथील वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात विसर्जनासाठी हौद बांधण्यात आला आहे. ५० बाय ५० फुटांचा हा हौद १८ फुट खोल असून, या हौदातच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन महापलिकेने केले आहे़पाणीपुरवठा अभियंता शेख इस्माईल यांनी सांगितले, मागील चार-पाच वर्षांपासून मनपाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे़ जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये गणेश मंडळांची गर्दी होऊ नये, या दृष्टीने गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी येण्याचा व जाण्याचा स्वतंत्र रस्ता केला आहे़ त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार असून, पोलिसांचा पुरेसा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे़ तेव्हा गणेश भक्तांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़गणेश मूर्ती : संकलनाचा उपक्रमश्री गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी महापालिकेने शहरातील विविध भागात गणेश मूर्ती संकलनाची सुविधा केली आहे़ नागरिकांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती प्रभाग समिती अ अंतर्गत जिंतूर रोडवरील गणपती चौक येथे आणून ठेवावेत, तसेच प्रभाग समिती ब अंतर्गत क्रांती चौक, दर्गा रोड परिसरासाठी कृत्रिम रेतन केंद्र या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे़ प्रभाग समिती क अंतर्गत काळी कमान, देशमुख हॉटेल या ठिकाणी संकलन केले जाणार आहे़ नागरिकांनी मनपाच्या संकलन केंद्रातच गणेश मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे, उपमहापौर माजू लाला, सभापती सुनील देशमुख, आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे़राहटी येथे पोलिसांचा बंदोबस्तवसमत रस्त्यावरील राहटी बंधाºयात यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते़ राहटी बंधाºयात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मागील तीन वर्षांपासून प्रतिबंध करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, विसर्जनासाठी जलशुद्धीकरण केंद्राची जागा निश्चित करण्यात आली आहे़२००० अधिकारी, कर्मचारी नियुक्तीपरभणी- गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला असून, सुमारे २ हजार अधिकारी आणि कर्मचाºयांची बंदोबस्त कामी नियुक्ती केली आहे़ शहरामध्ये ठिक ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले आहेत़ त्याचप्रमाणे संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्तही लावला आहे़ रविवारी गणरायांना निरोप देण्यासाठी शहराच्या विविध भागातून विसर्जन मिरवणुका काढल्या जातात़ ढोल-ताशांच्या गजरात निघणाºया या मिरवणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरामध्ये बंदोबस्त वाढविला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस