शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

परभणी : विविध आंदोलनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:26 IST

केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि शहर परिसरातील मुख्य रस्त्यांवर शेतकरी संघटनांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे बुधवारचा दिवस गाजला़ केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात देश पातळीवर विविध संघटनांनी संपाची हाक दिली होती़ या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यातील संघटना जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटक, रिपाइं, राज्य अंगणवाडी कर्मचारी यांच्याविविध संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपले प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर मांडले़ या आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प पडल्याचे पाहावयास मिळाले़परभणीत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाºया सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, यासह अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा या प्रश्नावर किसान संघर्ष समन्वय समितीने बुधवारी सकाळी परभणी-गंगाखेड रस्त्यावर पोखर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले़या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजेपासून किसान समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच या परिसरातील शेतकरी एकत्र आले़ यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक कॉ़ विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ शेतकºयांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ २०११ पासून ते २०१९ पर्यंत ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे, सोयाबीन व कापूस नुकसानीपोटी हेक्टरी ४२ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, नुकसान भरपाई न देणाºया कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करयात आल्या़ आंदोलनामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले़ या आंदोलनात कॉ़ विलास बाबर, मदनराव वाघ, सुभाष कच्छवे, अंकुश तवर, बालासाहेब वाघ, परसराम रासवे, नरहरी वाघ, सुरेश कच्छवे, अमृतराव वैरागड, सुरेश बेले, अंगद वैरागर, रायभान भुमरे, अनिल अमोलगे, ज्ञानोबा डोणे, अनंतराव कच्छवे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़वीज कर्मचारीही संपातपरभणी : येथील महावितरण कंपनीतील वर्कर्स फेडरेशन अंतर्गत वीज कर्मचाºयांनी शासकीय धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी संपात सहभाग नोंदविला़ जिल्हाभरातील कायम आणि कंत्राटी असे २४० कर्मचारी संपात सहभागी झाले होते़ त्यामुळे वीज कंपनीचे कामकाजही विस्कळीत झाले़टोलनाक्यावर रास्ता रोकोपरभणी : प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार स्वीकारू नये, जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक विमा वितरित करावा, कर्जमुक्तीचा लाभ विनाअट द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी-गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ किशोर ढगे, भास्कर खटींग, दिगंबर पवार, रामभाऊ आवरगंड, केशव आरमळ, मुंजाभाऊ लोडे, हनुमान भरोसे, कल्याण लोहट, छगन गरुड, दत्ता गरुड, बाळू गरुड, संतोष गरुड, रामकिशन गरुड, उस्मानभाई पठाण, सुधाकर खटींग, वैजनाथ खटींग आदी आंदोलनात सहभागी झाले होते़बंदला संमिश्र प्रतिसादसेलू : देशव्यापी बंदला सेलू शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला़ माकप व किसान सभेच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले़यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या आंदोलनात कॉ़ रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, दत्तूसिंग ठाकूर, नारायण पवार, राजाभाऊ साखरे, उद्धव पौळ, जाहेद घौरी, भास्कर कदम, रोहिदास हातकडके, रामराव कदम, शेख बाबूलाल, अ‍ॅड़ कादरी शेख साजीद आदी सहभागी झाले होते़शालेय पोषण आहार संघटनापरभणी : केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात येथील लाल बावटा प्रणित शालेय पोषण आहार कामगार संघटनेने शिक्षण विभागासमोर निदर्शने करून शिक्षणाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले़ देशव्यापी संपात या संघटनेने सक्रिय सहभाग नोंदविला़ केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. केंद्र शासनाने कामगार विरोधी निर्णय रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ कीर्तीकुमार बुरांडे, पंढरीनाथ मुळे, हरिभाऊ देशमुख, पांडुरंग होरकळ, भगवान बोबडे, प्रतिमा कच्छवे, अंजना कच्छवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़राष्ट्रीय बालकामगार शिक्षक कर्मचारी संघटनेनेही आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले़ बालकामगारांना शालेय पोषण आहार द्यावा, शिक्षक कर्मचाºयांचे मानधन कपात करू नये आदी मागण्या करण्यात आल्या़ निवेदनावर उषा दळवी, संजिवनी बोराडे, राजेश्री वाटोडे, ललिता वायचळ, वर्षा कदम आदी ३६ जणांची नावे आहेत़आयटकचे धरणे आंदोलनआयटक संघटनेच्या वतीने ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदवित या संपालाही संघटनेने पाठिंबा दिला़सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टा बाजारावर बंदी घालावी, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, सीएए, एनपीआर व एनसीआर रद्द करावे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालकधार्जिण्या अटी रद्द कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कामगार, ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यशस्वीतेसाठी अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर, कॉ़ शेख अब्दुल, शेख मुनीर, अजगर, ज्योती कुलकर्णी, अर्चना फड, सीमा देशमुख, सुनीता धनले आदींनी प्रयत्न केले़अंगणवाडी कर्मचाºयांचा धडकला मोर्चापरभणी : अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने दुपारी १़३० वाजता रेल्वेस्थानक परिसरातून मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा उड्डाणपूलमार्गे जिल्हा परिषदेवर धडकला़ अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन द्यावे, अंगणवाडी केंद्राचे भाडे सुधारित करावे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजनेची अंमलबजावणी करावी आदी २२ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या़एनआरसी, सीएएच्या विरोधात मोर्चापरभणी : केंद्र शासनाच्या एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ एनआरसीच्या यादीतून ज्या १७ लाख २० हजार ९३३ लोकांना काढून टाकले आहे़ त्यांना परत सहभागी करून घ्यावे, सीएए कायदा रद्द करावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली़ त्यानंतर आयोजित सभेत उपस्थितांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले़ या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक लखन चव्हाण, मुंजाजी गोरे, सुरेश शिंदे, बालासाहेब लंगोटे, सुभाष साडेगावकर, आरेफ पटेल यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते़बँकांचे कामकाज सुरळीतपरभणी : येथील राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज बहुतांश शाखांमध्ये सुरळीत सुरू असल्याचे पाहावयास मिळाले़ देशव्यापी संपामध्ये काही संघटनाच सहभागी झाल्याने उर्वरित कर्मचारी नियमित कामकाजावर उपस्थित होते़ महाराष्ट्र स्टेट बँक एम्पॉलईज फेडरेशनने मात्र संपात सहभाग नोंदविला़ बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, पेन्शन योजनेतील सुधार व प्रलंबित वेतन वाढीचा करार करावा इ. मागण्या करण्यात आल्या़शासकीय कामकाज ठप्प४परभणी: जुनी पेन्शन योजना लागू करावी, महागाई भत्ता आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेसह राज्य सरकारी कर्मचाºयांनीही बुधवारी संपात सहभाग नोंदविला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी