लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी भागातील विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी अर्बन सेल काम करणार असून, यासाठी प्रत्येक शहरांमध्ये २६ समान मुद्यांवर जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सेलच्या अध्यक्षा खा़ वंदना चव्हाण यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सेलच्या अध्यक्षा खा़ वंदना चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण भागातील पक्ष आहे़, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे़ प्रत्यक्षात राष्ट्रवादी हा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागामध्ये काम करणारा पक्ष आहे; परंतु, या संदर्भात होणाऱ्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पक्षाने अर्बन सेलची स्थापना केली आहे़या सेलमध्ये प्रत्येक शहरात २० ते २५ जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे़ ही समिती शहरातील विविध नागरी समस्या चव्हाट्यावर आणून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणार आहे़ यासाठी सर्व शहरांकरीता २६ कॉमन मुद्दे तयार करण्यात आले आहेत़ याच मुद्यांवर काम केले जाणार आहे़ त्यामध्ये शहरांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वृद्ध, महिला, बालके, युवक यांचे प्रश्न सोडविणे आदींचा समावेश आहे़ या सेलमध्ये महिलांची स्वतंत्र विंग कार्यरत राहणार आहे़ राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडी सरकारने अनेक चांगली कामे केली; परंतु, आम्ही मार्केटींगमध्ये कमी पडलो़ त्यामुळे आम्हाला निवडणुकीत फटका बसला़ आता मात्र आम्हीही मार्केटींगचा वापर करणार आहोत़ सध्याचे सरकार हे काहीही कामे न करता जुमलेबाजी करून नुसतीच मार्केटींग करीत आहे़ त्यामुळे या सरकारला चोख उत्तर देण्याचे काम अर्बन सेलच्या माध्यमातून करण्यात येणर असल्याचे खा़ चव्हाण यांनी सांगितले़ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘निरोगी जीवन हक्क माझा’ ही मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे अध्यक्षा फौजिया खान यांनी यावेळी सांगितले़यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनीही सेलच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्नांवर आगामी काळात आंदोलन करणार असल्याचे सांगितले़ यावेळी आ़ विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, शहराध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्षा नंदाताई राठोड आदींची उपस्थिती होती़मनपातील १३ नगरसेवकांनी फिरविली पाठराष्ट्रवादी अर्बन सेलच्या कामकाजाची तसेच ‘निरोगी जीवन हक्क माझा’ या मोहिमेची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमास पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांना राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी सकाळी बोलावण्यात आले होते; परंतु, या कार्यक्रमाकडे मनपातील पक्षाच्या १३ नगरसेवकांनी पाठ फिरविली़ अॅड़ स्वराजसिंह परिहार यांना शहराध्यक्ष पदावरून दूर केल्यापासून राष्ट्रवादीमधील अंतर्गत मतभेदाची दरी वाढली आहे़ त्यातूनच अॅड़ परिहार यांच्यासह हे तेराही नगरसेवक या कार्यक्रमाला गैरहजर होते़ त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा यावेळी कार्यकर्त्यांमधून होताना दिसून आली़महिला आघाडीने सरकारची तिरडी काढून केले आंदोलन४यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने ‘निरोगी जीवन हक्क माझा’ या मोहिमेंतर्गत जिल्हा रुग्णालयात रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली़ त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व तिरडीचे दहन करण्यात आले़ यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ परभणी : अर्बन सेलद्वारे शहरी समस्या चव्हाट्यावर आणणारलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी भागातील विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी अर्बन सेल काम करणार असून, यासाठी प्रत्येक शहरांमध्ये २६ समान मुद्यांवर जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सेलच्या अध्यक्षा खा़ वंदना चव्हाण यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सेलच्या अध्यक्षा खा़ वंदना चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण भागातील पक्ष आहे़, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे़ प्रत्यक्षात राष्ट्रवादी हा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागामध्ये काम करणारा पक्ष आहे; परंतु, या संदर्भात होणाऱ्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पक्षाने अर्बन सेलची स्थापना केली आहे़या सेलमध्ये प्रत्येक शहरात २० ते २५ जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे़ ही समिती शहरातील विविध नागरी समस्या चव्हाट्यावर आणून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणार आहे़ यासाठी सर्व शहरांकरीता २६ कॉमन मुद्दे तयार करण्यात आले आहेत़ याच मुद्यांवर काम केले जाणार आहे़ त्यामध्ये शहरांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वृद्ध, महिला, बालके, युवक यांचे प्रश्न सोडविणे आदींचा समावेश आहे़ या सेलमध्ये महिलांची स्वतंत्र विंग कार्यरत राहणार आहे़ राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडी सरकारने अनेक चांगली कामे केली; परंतु, आम्ही मार्केटींगमध्ये कमी पडलो़ त्यामुळे आम्हाला निवडणुकीत फटका बसला़ आता मात्र आम्हीही मार्केटींगचा वापर करणार आहोत़ सध्याचे सरकार हे काहीही कामे न करता जुमलेबाजी करून नुसतीच मार्केटींग करीत आहे़ त्यामुळे या सरकारला चोख उत्तर देण्याचे काम अर्बन सेलच्या माध्यमातून करण्यात येणर असल्याचे खा़ चव्हाण यांनी सांगितले़ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘निरोगी जीवन हक्क माझा’ ही मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे अध्यक्षा फौजिया खान यांनी यावेळी सांगितले़यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनीही सेलच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्नांवर आगामी काळात आंदोलन करणार असल्याचे सांगितले़ यावेळी आ़ विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, शहराध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्षा नंदाताई राठोड आदींची उपस्थिती होती़मनपातील १३ नगरसेवकांनी फिरविली पाठराष्ट्रवादी अर्बन सेलच्या कामकाजाची तसेच ‘निरोगी जीवन हक्क माझा’ या मोहिमेची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमास पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांना राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी सकाळी बोलावण्यात आले होते; परंतु, या कार्यक्रमाकडे मनपातील पक्षाच्या १३ नगरसेवकांनी पाठ फिरविली़ अॅड़ स्वराजसिंह परिहार यांना शहराध्यक्ष पदावरून दूर केल्यापासून राष्ट्रवादीमधील अंतर्गत मतभेदाची दरी वाढली आहे़ त्यातूनच अॅड़ परिहार यांच्यासह हे तेराही नगरसेवक या कार्यक्रमाला गैरहजर होते़ त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा यावेळी कार्यकर्त्यांमधून होताना दिसून आली़महिला आघाडीने सरकारची तिरडी काढून केले आंदोलन४यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने ‘निरोगी जीवन हक्क माझा’ या मोहिमेंतर्गत जिल्हा रुग्णालयात रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली़ त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व तिरडीचे दहन करण्यात आले़ यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़पाथरी काँग्रेसला गेल्यास परभणी राष्ट्रवादीला मिळावी-दुर्राणीयावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पाथरीची जागा माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासाठी काँग्रेसकडे गेल्यास परभणीची काँग्रेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे, तसा प्रयत्नही पक्षाच्या वतीने आपण वरिष्ठ पातळीवर करणार आहे़ याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे ते म्हणाले.
परभणी : अर्बन सेलद्वारे शहरी समस्या चव्हाट्यावर आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:58 PM