शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:05 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे.२० फेब्रुवारीपर्यंत गावातील दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नियुक्त कर्मचारी तहसील कार्यालयात तळ ठोकून आहेत.शेतकºयांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेबु्रुवारी रोजी घेतला. शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे व आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. २ हेक्टरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात ३ टप्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. याचा पहिला हप्ता मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात जमा केला जाणार आहे. दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जूनमध्ये दिला जाणार आहे. तालुक्यात ही योजना राबविण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला नोंदणी करताना अनेक नियम व अटी असल्याने कुटुंबांची व्याख्या ठरविणे कठीण होऊन बसले होते. अनेक अधिकारी व कर्मचारी पात्र, अपात्र निकषाबाबत गोंधळून गेले होते. त्यातच शासनाच्या परिपत्रकात दररोज बदल होत असल्याने अधिकाºयांची चांगलीच दमछाक उडाली होती. यामुळे ही योजना पात्र, अपात्रतेच्या घोळात अडकून बसते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र सर्व अडथळे पार करून सरते शेवटी केंद्र सरकारच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार केला असून तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय या तीनही कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून आहेत. २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील १४ गावातील दीड हजार शेतकºयांची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.काम युद्धस्तरावर सुरूलोकसभा निवडणूक तोंडावर आली असून मार्च महिन्यात कधीही अचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या खात्यात पहिला हप्ता जमा व्हावा, यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांना तातडीने माहिती अपलोड करण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी दौरा करीत आहेत. मानवत तहसील कार्यालयात माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून २० फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी कोळी यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती घेतली. एकूणच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीprime ministerपंतप्रधानFarmerशेतकरी