शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:08 IST

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरविरुद्ध महसूल पथकाने कारवाई केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरविरुद्ध महसूल पथकाने कारवाई केली आहे़तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातील दुसलगाव व चिंचटाकळी येथील दोन धक्क्यांचे लिलाव झाले आहेत़ इतर ठिकाणच्या वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसताना या ठिकाणावरून राजरोजपणे वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे़ गोदावरी नदीपात्रातून दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळा वाळुची चोरी केली जात असून, अनेक वेळा वाळू वाहतुकीतून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत़ ९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी नितीन भंडारे, चंद्रकांत साळवे यांचे पथक महातपुरी परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता, नदीपात्रा जवळील खंडोबा मंदिर परिसरात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच २२ एडी-१५३८) मिळून आला़ तर ११ जून रोजी तलाठी चंद्रकांत साळवे व विनोद मुळे यांनी मसला परिसरात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला़ हे दोन्ही ट्रॅक्टर गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत़तालुक्यातील गौंडगाव येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला नसतानाही गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा केला जात असल्याबद्दल ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्याने १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश चव्हाण, मंडळ अधिकारी शंकर राठोड, विनोद मुळे, चंद्रकांत साळवे, नितीन भंडारे यांच्या पथकाने या नदीपात्रातून वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले़तीन दिवसांत चार ट्रॅक्टर पकडले४गंगाखेड येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई सुरू केली आहे़४९ जून ते १२ जून या तीन दिवसांमध्ये एकूण चार वाहनांविरूद्ध तहसील प्रशासनाने कारवाई केली़ यामुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत़४तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव झालेले नसतानाही अवैधरित्या वाळूची चोरी केली जात आहे़ वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग