शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी आगारातील प्रकार;ड्युटी न मिळाल्यास टाकली जातेय रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:39 IST

बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.परभणी आगारामधून दररोज सकाळी वाहक आणि चालकांना बसगाड्यांचे नियोजन करुन ड्युटी दिली जाते. त्यामुळे येथील आगारात सकाळी वाहक-चालक उपस्थित राहतात; परंतु, अनेकांना ही ड्युटी मिळत नाही.परभणी आगारामध्ये बसगाड्यांची संख्या कमी असल्याने सर्व मार्गावर बसफेºया चालविल्या जात नाहीत. परिणामी दररोज तीन ते चार चालक-वाहकांना ड्युटीच मिळत नाही. हे वाहक-चालक नियमानुसार सेवेसाठी हजर झाल्याने त्यांची त्या दिवसाची सेवा ग्राह्य धरणे अपेक्षित आहे; परंतु, या चालक-वाहकांकडून रजा घेतली जाते. त्यावर ‘कामगिरी नाही’, असा उल्लेखही केला जातो. वाहक आणि चालकांना ड्युटी देण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळाची आहे. महामंडळ चालक-वाहकांना काम उपलब्ध करुन देत नसेल तर त्यांच्याकडून रजा घेणे नियमबाह्य आहे. यात चालक आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एस.टी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन वाहक-चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात प्रभारी आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार फोन केले; परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने आगाराची बाजू समजू शकली नाही.खराब रस्त्यांचाही कर्मचाºयांना फटकापरभणी आगारामध्ये एकूण ३१० चालक, वाहक आहेत. तसेच ६५ बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १० बसगाड्या नादुरुस्त असतात. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ५५ बसगाड्यांचाच वापर होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्व वाहक-चालकांना दररोज ड्युटी मिळत नाही आणि सेवेवर हजर झाले असतानाही महामंडळाच्या नियोजनाअभावी वाहक, चालकांची रजा घेतली जात आहे.अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेनावाहक आणि चालकांना नियमानुसार २०० कि.मी. अंतरापर्यंची ड्युटी देऊन ८ तासांची सेवा त्यांच्याकडून करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात काही वाहक, चालकांना ३०० कि.मी.ची ड्युटी देऊन १२ तासांपर्यंतची सेवा करुन घेतली जात आहे. अतिरिक्त ४ तासांच्या सेवेचा मोबदलाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केल्या.असा प्रकार होत नाहीग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने बससेवा पोहचविण्यासाठी वेळ लागत आहे. काही वाहक-चालक ठराविक रुटसाठीच आग्रह धरतात; परंतु, वाहक आणि चालकांना ड्युटी भेटत नाही, असा प्रकार होत नाही. एखाद्या वाहक-चालकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल.-जालिंदर सिरसाट, विभागीय नियंत्रक

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळ