शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:16 IST

चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़तांदूळवाडी (ता़जिंतूर) येथील कल्याण साहेबराव पिसोरे हे एमएच २२ एसी- ५४७३ या क्रमांकाच्या दुचाकीने करंजी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते़ पिसोरे हे सकाळी ७़३० च्या सुमारास कोल्हा पाटी येथील वळण रस्त्यावर आले असता, पुण्याहून परभणीच्या दिशेने जाणाºया एक खाजगी ट्रॅव्हल्स (एमएच १४ सीडब्ल्यू-९१७१) चुकीच्या दिशेने आली़ या ट्रॅव्हल्सने पिसोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली़ त्यात पिसोरे यांच्या हाताला व डोक्याला मार लागला आहे़ जखमी पिसोरे यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान घटनेमुळे काही वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, बीट जमादार प्रताप साळवणे, चालक खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.कार पलटी झाल्याने चौघे जखमी४मानवत- राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हावाडी शिवारात पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक कार पलटी होऊन चार जण जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़४जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील डॉ़ पोकर्णा, दिलीप तमशेटे, अनंता भुले, राजू म्हेत्रे हे चौघे एमएच २४ व्ही-१०८७ या क्रमांकाच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरून परभणीकडे जात होते़४बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोल्हावाडी शिवारात पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला व ही कार पलटी झाली़ त्यात कारमधील चौघे जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हा येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारAccidentअपघात