शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Parbhani: दुचाकी चार चाकीचा भीषण अपघात, पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

By ज्ञानेश्वर भाले | Updated: January 14, 2024 23:20 IST

Parbhani News: पोखर्णी पाथरी  मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले.

- ज्ञानेश्वर भाले

दैठना/ सोनपेठ (परभणी) : पोखर्णी पाथरी  मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहन जळून खाक झाले. यात प्रभाकर मारोतराव गवारे (५६, रा. पाथरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. 

गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. रविवारी रात्री ते परभणी येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते. दरम्यान भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी क्रमांक (एम एच १२ एम एल ४७५०) वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्याने त्या खाक झाल्या. या दरम्यान चार चाकी वाहनातील प्रवासी आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी गाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले. अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.

नुकतीच मिळाली होती पदोन्नतीसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी