शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परभणी : लाल फितीत गुदमरतोय बालविकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:18 IST

बालकांच्या हक्कासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या यात असल्या तरी प्रशासकीय लालफितीचा कारभार आणि शासकीय अनास्थेमुळे या योजना गरजू बालकांपर्यंत पोहचत नाहीत. परभणी जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष दोन वर्षापासून बंद असल्याने ही परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. बालक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या विषयी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: बालकांच्या हक्कासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या यात असल्या तरी प्रशासकीय लालफितीचा कारभार आणि शासकीय अनास्थेमुळे या योजना गरजू बालकांपर्यंत पोहचत नाहीत. परभणी जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष दोन वर्षापासून बंद असल्याने ही परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. बालक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या विषयी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासनस्तरावरुन बालविकासाच्या विविध योजना आखल्या जातात. त्यांच्या अंमलबजावणीबाबत मोठ मोठ्या चर्चाही होतात; परंतु, प्रत्यक्षात या योजना लाभार्थी बालकांपर्यंत पोहचत नाहीत, हेच जिल्ह्यातील बालके अनुभवत आहेत. जिल्ह्यात बालकांवर वाढलेले अत्याचार, बालकामगारांचे वाढते प्रमाण या चिंतेच्या बाबी असून दोन वर्षापूर्वीपर्यंत कार्यरत असलेला बाल संरक्षण कक्ष शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे व कर्मचारी भरती होत नसल्याने बंद आहे. बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय घडवून आणणे, पीडित बालकाला वेळेत मदत पुरविणे, बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविणे, अशी कामे या कक्षाच्या माध्यमातून केली जातात. त्याच प्रमाणे तालुकास्तरावरील समित्यांचे गठण, ग्रामीण स्तरावरील समित्या गठित करुन बालविकासाचे काम ग्राम पातळीवर पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका हा कक्ष राबवितो. मात्र जिल्ह्यात बालसंरक्षण कक्षच बंद असल्याने पीडित बालकांना न्याय देताना अडचणी निर्माण होत आहेत.बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन यांच्यामार्फत जिल्ह्यात चांगले काम होत आहे. बालकांच्या हक्कासाठी जनजागृती शिबिरे घेणे, विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना मदत करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. मात्र या दोन्ही संस्थांमध्ये कामे करणाºया समाजसेवींना नियमित मानधन, प्रवास खर्च मिळत नाही. जिल्ह्यात मुलींचे निरिक्षणगृह नाही. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हास्तरावर बालकांसाठी काम करणारे अधिकारी, सर्व समित्या, चाईल्ड लाईन आणि बालहक्कासाठी काम करणाºया यंत्रणांमध्ये समन्वय साधून एकसंघ काम करण्यासाठी प्रयत्न झाले तर बालविकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.बालकल्याण समिती ही मुुलांचे हक्क, त्यांचे संरक्षण, संगोपन यासाठी काम करीत असून मुलांचे सर्वोत्तम हीत लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. मुलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्कापासून मुले वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न केले जातात. जिल्ह्यामध्ये मुलींचे निरीक्षणगृह स्थापन करावे, यासाठी बालकल्याण समिती वारंवार पाठपुरावा करीत आहे. यापुढेही मुलांच्या हक्कासाठी समितीकडून चांगले काम केल जाईल.-अ‍ॅड.संजय केकान, अध्यक्ष, बालकल्याण समिती

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार