शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विज्ञान दिनानिमित्त स्मशानभूमीत काढली सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:17 IST

स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्मशानभूमी म्हटलं की अंगावर काटा येतो. या ठिकाणी भुतांचा वावर असतो, अमावस्येला ही भूते बाहेर येतात, असे अनेक गैरसमज आहेत. विज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागात या समजुती अजूनही रुढ आहेत. विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या विषयी जनजागृती व्हावी, ते विज्ञाननिष्ठ व्हावेत व भूत आणि भुतांबद्दलचा गैरसमज दूर व्हावा, या उद्देशाने टाकळी कुंभकर्ण येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच झरी येथील स्व.इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम स्मशानभूमीत विद्यार्थ्यांना नेण्यात आले. या ठिकाणी चार ते पाच तास विद्यार्थी थांबले. घरुन तळून आणलेले भजे व इतर जेवण याच ठिकाणी त्यांनी केले.विशेष म्हणजे, या स्मशानभूमीतील मसनजोगी पवार यांच्याशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. पवार हे याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षांचा त्यांचा नातूही स्मशानभूमीतच राहतो. यावेळी विद्यार्थ्यांनी भुतांबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी त्यांना विचारणा केली. स्मशानभूमीत तेलकट खाल्ल्याने भुते बाहेर येतात का? असाही प्रश्न या विद्यार्थ्यांनी केला. या सर्व गैरसमजुतीचे पवार आणि विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी निराकरण केले.४या शैक्षणिक सहलीविषयी माहिती देताना प्रकाश पंडित म्हणाले, शाळेमध्ये नित्यनेमाने विज्ञान उपक्रम राबविले जातात, फेब्रुवारी महिन्यात २८ तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी झरी येथील स्मशानभूमीचे अतिशय रेखीवपणे सुशोभिकरण केले आहे. वेगवेगळी फुलांची झाडे, आकर्षक बांधकाम, आसन व्यवस्था, रंगरंगोटी, सुविचारांने ही स्मशानभूमी सजविली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विद्यार्थ्यांची सहल घडविली, असे पंडित यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीscienceविज्ञान