शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रभाग समितीतून मिळणार हस्तांतरण प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:17 IST

शहरातील मालमत्तांच्या खरेदी- विक्रीनंतर महापालिकेतून दिले जाणारे हस्तांतरण प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आता प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या सहाय्यक आयुक्तांकडून दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील मालमत्तांच्या खरेदी- विक्रीनंतर महापालिकेतून दिले जाणारे हस्तांतरण प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आता प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या सहाय्यक आयुक्तांकडून दिला जाणार आहे.मालमत्तांचे हस्तांतरण प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वी महापालिकेत स्वतंत्र फेरफार विभाग कार्यरत होता. मात्र शासनाच्या धोरणानुसार व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार महापालिकेने हा फेरफार विभाग बंद केला असून त्याचे अधिकार प्रभाग समित्यांना दिले आहेत. हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, मालमत्ताकर उतारा देणे व थकबाकी नसल्याचा दाखला देणे, यासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून कर निरीक्षक, प्रथम अपीलिय प्राधिकारी म्हणून कर अधीक्षक आणि द्वितीय अपिलीय प्राधिकारी म्हणून प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त हे काम पाहणार आहेत.प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी कर निरीक्षकांकडे वार्डनिहाय हस्तांतरण नोंद रजिस्टर द्यावे, त्याच प्रमाणे दुय्यम निबंधकांनी निश्चित केलेल वार्षिक दर व बांधकामाच्या वर्गीकरणानुसार आकारणीसाठी निश्चित केलेले दर वेळोवेळी प्रभाग समितीकडे सोपवावेत. सहाय्यक आयुक्तांनी हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा व थकबाकी नसल्याच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह परिपूर्ण संचिका स्वीकारुन त्या पुढील कार्यवाहीसाठी वसुली लिपिकांकडे सोपवाव्यात. वसुली लिपिकांनी कागदपत्रांची तपासणी, मालमत्ता कराची आकारणी व स्थळ पाहणी करुन या संचिका कर निरिक्षकांकडे सादर कराव्यात आणि कर निरिक्षकांनी हस्तांतरण फी निश्चित करुन कर अधीक्षकांकडे संचिका सादर कराव्यात, असे आदेश दिले आहेत.कर अधीक्षकांनी मालमत्ताकर, हस्तांतरण फी तपासून सहाय्यक आयुक्तांकडे या संचिका सादर कराव्यात. त्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी हस्तांतरण शुल्क जमा झाल्यानंतरच हस्तांतरण प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे.हस्तांतरण प्रमाणपत्रासाठी १५ दिवसांची कालमर्यादाहस्तांतरण प्रमाणपत्र देण्यासाठी प्रभाग समित्यांना १५ दिवसांची कालमर्यादा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मालमत्ताकर उतारा आणि थकबाकी नसल्याचा दाखला देण्यासाठी तीन दिवसांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. प्रभाग समिती अंतर्गत प्रत्येक अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारीही सोपविण्यात आली असून या जबाबदारीनुसार शासकीय नियमानुसार वेळेत कार्यवाही करावी, कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाHomeघर