शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:40 IST

मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.रेल्वे मार्गावरुन जास्तीत जास्त गाड्या धावाव्यात, कमी वेळेत अंतर पार करता यावे आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतुने रेल्वे विभागाने मुदखेड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मुदखेड ते परभणी दुहेरीमार्ग पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्या विना अडथळा धावतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. जलद गाड्यांच्या प्रवासात काही थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सवारी गाड्यांचा प्रश्न मात्र कायम आहे. रेल्वे गाड्यांच्या लूज टाईमचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.निजामाबाद - पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी नांदेड येथून रेल्वे वेळापत्रकान्वये ४ वाजता निघून परभणी येथे ६.२० वाजता पोहचणे अपेक्षित आहे. मात्र या रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात लूज टाईम दिला आहे. नांदेड येथून निघाल्यानंतर पूर्णा स्थानकावर साधारणत: अर्धा तास आणि त्यानंतर मिरखेल स्थानकावर एक तास ही रेल्वेगाडी कारण नसतानाही थांबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नांदेडहून ४.४५ वाजता निघालेली नंदीग्राम एक्सप्रेस आणि ५.३० वाजता निघणारी पनवेल एक्सप्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या पुढे सोडून त्यानंतर पंढरपूर पॅसेंजर रेल्वे परभणीकडे मार्गस्थ केली जात आहे. परिणामी, परभणीत ६.२० वाजता पोहोचणे अपेक्षित असणारी ही रेल्वेगाडी तब्बल १ तास उशिराने ७.२० पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे दुहेरीकरण होऊनही प्रवाशांचा त्रास कायम असून रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकाचे नियोजन करुन पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या वेळेत धावतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडीpassengerप्रवासी