शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:36 IST

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. या सातही आगाराला जोडणारा दुवा म्हणजे परभणी येथील आगार आहे. परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या आगारातून जिल्ह्यातील ९ तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारात थेट बससेवा असणे आवश्यक आहे; परंतु, एकीकडे १३ कोटी रुपये खर्च करुन बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन झाले असताना दुसरीकडे याच आगारातील प्रवाशांना बसच उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे गुरुवारी व शुक्रवारी दिसून आले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसला होणारी गर्दी लक्षात घेता परभणी बसस्थानक आगार प्रशासनाने प्रवाशांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते; परंतु, तसे होताना दिसून आले नाही.परभणी आगारामध्ये ६८ बसेस आहेत. यातील १५ बसेस दररोज दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. त्यामुळे उर्वरित ५३ बसच्या माध्यमातून आगारातून ६४ फेºया मारल्या जातात. त्यामुळे अनेक तालुक्यांसह ग्रामीण भागात बस पोहचविण्यासाठी विलंब होत आहे. त्याच बरोबर गाडी नादुरुस्त झाल्यास अनेक बसफेºया रद्द झाल्याचेही प्रकार समोर आले आहे. ज्या बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. त्याही खिळखिळ्या झालेल्या आहेत. या बसमधूनच प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. नव्या बसची परभणी आगाराने मागणी करुनही बस मिळत नसल्याने आहे, त्याच बसेसवर भागवावे लागत आहे. यामुळे भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागीय नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन परभणी आगाराला नवीन बस उपलब्ध करुन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.ग्रामीण भागात: भंगार बसच्या फेºया४परभणी आगारातून तालुक्यातील उमरी, लोहरा, भोसा, कुंभारी बाजार, साडेगाव, मांडाखळी, पेडगाव, स.पिंपळगाव, रामपुरी यासह अनेक गावांमध्ये बसफेºया सुरु आहेत. यातून आगाराला मोठे उत्पन्नही मिळते; परंतु, मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागात जाणाºया बसेस या पूर्णत: खिळखिळ्या झाल्या आहेत.४ काही बसेसच्या तर खिडक्या, तावदाने, आसन व्यवस्था मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच बरोबर प्रचंड धुळीच्या वातावरणात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र आगार प्रशासन, ना विभागीय नियंत्रकांचे लक्ष आहे. परिणामी नाईलाजास्तव ग्रामीण भागातील प्रवाशांना बसने प्रवास करणे भाग पडत आहे.४परभणी आगारातून धावणाºया बसेसमधून मोठ्या प्रमाणातून धूर बाहेर पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी प्रवाशांसह नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. भंगार बसेस बंद करुन नवीन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी