शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:संत बाळू मामांची पालखी आज कुंभारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:40 IST

तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचे गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात आगमन झाले आहे. पूर्णा तालुक्यातील कौडगाव व परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, शहापूर या गावांमध्ये पालखीचा ६ दिवसांचा मुक्काम राहिला. या मुक्कामा दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहापूर व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पालखीचे कुंभारी गावात आगमन होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांच्या वतीने या पालखीच्या आयोजनाची तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी पालखी दाखल झाल्यानंतर गावातून या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.या पालखीचा सहा दिवस कुंभारीत मुक्काम राहणार आहे. या सहाही दिवशी कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशितील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.टाकळी, शहापूर येथे भाविकांची मांदीयाळी४परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान संत बाळूमामा पालखीचा मुक्काम होता. तर शहापूर येथे १३ ते १८ डिसेंबर दरम्यान पालखीचा मुक्काम होता. पालखीच्या दर्शनासाठी दर दिवशी जवळपास ५ हजारच्या वर भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. तसेच १२ दिवस शहापूर व टाकळी कुंभकर्ण ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी टाकळी कुंभकर्ण व शहापूर या गावांमध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.