शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

परभणी : दीड हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क येलदरी ( परभणी  ): येथील येलदरी धरणात मागील चार ते पाच वर्षापासून अत्यल्प पाणीसाठा राहत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ): येथील येलदरी धरणात मागील चार ते पाच वर्षापासून अत्यल्प पाणीसाठा राहत असल्याने धरणातील मत्य्सय व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे दीड हजाराहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येलदरी धरणात मागील ५० वर्षापासून मत्स्य व्यवसाय केला जातो. या व्यवसायापासून जवळपास दीड हजाराहून अधिक कुटुंंबातील नागरिकांची उपजिविका अवलंबून आहे. काही वर्षापासून येलदरी धरणातील गोड्या पाण्यातील माशाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. मागील तीन वर्षापासून पहिल्यांदाच गोड्या पाण्यातील प्रॉन्स विकसित केला आहे.येलदरी येथील गोड्या पाण्यात झिंगा मिळू लागल्याने या जलाशयाची वेगळी ओळख गोड्या पाण्यातील माशांबरोबरच गोड्या पाण्यातील झिंग्यामुळे सर्वत्र झाली. मात्र मागील चार वर्षापासून या धरणावर निसर्गाची अवकृपा झाल्याने पाणीसाठी अधिक प्रमाणात होत नाही. त्यामुळे मस्त्य व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. त्यामुळे येथील मत्स्य व्यावसायिकांच्या आर्थिक तोट्यात मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणातील कमी होणाऱ्या पाण्यामुळे या व्यवसायात असलेल्या दीड हजार कुटुंबियांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पाण्याअभावी मत्स्य व्यवसाय थंडावला असल्याने बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे येलदरी येथील मत्स्य व्यवसायामुळे या भागातील मच्छीमारी करणाºया ग्रामस्थांचे जीवनमान सुधारले होते. मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यावर्षी संपूर्ण पावसाळा संपला तरी देखील धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.धरणात नव्याने मत्स्य बीज सोडण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने माशांची निर्मिती होत नाही. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असलेला कामगार चांगलाच अडचणीत आला आहे. येणाºया काळात चांगला पाऊस न पडल्यास येलदरी धरणावर पोट भरणाºया हजारो मच्छीमार व त्यांच्या कुटुंबियांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते.मागील चार ते पाच वर्षापासून या भागात अवर्षण सदृष्य परिस्थिती निर्माण होत असून शासनाने नदीजोड प्रकल्पाच्या योजनेत येलदरी धरणाचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यवसायिकांमध्ये व्यक्त होत आहे.शासनाकडून: मदतीची आवश्यकता४केवळ मत्स्यव्यवसायावर उपजिविका असलेल्यांची आता उपासमार होऊ लागली आहे. धरणामध्ये पाणी नसल्याने विक्रीसाठी मासे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.४केंद्र शासनाने ज्या प्रमाणे भूजलाशयीन, सागरी व निखारे पाणी क्षेत्रातील मत्सोत्पादन वाढीस लागण्याच्या दृष्टीकोणातून निधी उपलब्ध करून दिला. शिवाय धोरणात्मक निर्णय घेतले. त्या दृष्टीकोणातून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या मत्यस्य व्यवसायिकांना मदत करणे आवश्यक आहे.४निलक्रांती योजनेतर्गत मत्स्य व्यवसायिकांना साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय १६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या कृषी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने घेतला. त्या प्रमाणे येलदरी येथील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणाºयांना मदत करावी, अशी मागणी मत्स्य व्यवसायिकांकडून होऊ लागली आहे. या खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पिकांना मिळेना पाणीयेलदरी धरणातील पाण्यावर जवळपास ६० हजार हेक्टरवरील पिकांना पाणी देण्याचे नियोजन होेते;परंतु, धरण मृतसाठ्यात असल्याने खरीप व रबी हंगामातील पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हिच परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.खडकपूर्णा ठरतोय अडथळा पाणीसाठा होत नसल्याने अडचण४येलदरी धरणाच्या वरच्या भागात बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा येथे पूर्णा नदीवरच धरण बांधण्यात आले आहे. २०१३ पासून येलदरी धरणात येणाºया पाण्याचा वेग कमी झाला आहे.४परिणामी येलदरी धरणावर अवलंबून असलेले ६० हजार हेक्टरवरील शेती सिंचन क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना, मत्स्य व्यवसाय यासह धरणावरून अवलंबून असलेले सर्व व्यवसाय धोक्यात आले आहेत.४नदीमधील पाणी खडकपूर्णामधेच आडविले जात असल्याने येलदरी धरणाच्या पाणी साठविण्याठी खात्री देणे आता आवघड झाले आहे.४यावर्षी तर धरण परिसरात पाऊस न झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे केवळ ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मच्छीमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणWaterपाणी