शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोनपेठ येथील जबरी चोरी प्रकरणात तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:59 IST

सोनपेठ तालुक्यातील बुधापीर नदीपात्रात मोटारसायकल अडवून २१ हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सायबर सेल आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोनपेठ तालुक्यातील बुधापीर नदीपात्रात मोटारसायकल अडवून २१ हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सायबर सेल आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़२१ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नितीन भगवानराव सहजराव (रा़ ममदापूर ता़ परळी) हे बुधापूर नदीपात्रातून मोटारसायकलने जात असताना तिघांनी त्यांना अडवून सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रासलेट आणि एक मोबाईल असा २१ हजारांचा ऐवज लुटला होता़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ या प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उस्मान शेख यांनी एक पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला़ सायबर सेलच्या मदतीने १२ जून रोजी कृष्णा शंकर चव्हाण (रा़ लहुजीनगर सोनपेठ), रामा मिसाळ (रा़ सोनपेठ) व गोविंद मोरे (रा़ सोनपेठ) या तिघांना ताब्यात घेतले़ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़ या तीनही आरोपींना १४ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली़ ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उस्मान शेख, उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी, एम़एम़ भुमकर, गौस पठाण, राम घुले यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी