शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

परभणी : १५७४ मंडळांनी केले श्रींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:35 IST

महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.परभणी शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस विविध गणेश मंडळांकडून सुरुवात झाली. शहरातील मोठा मारुती देवस्थानच्या मानाच्या गणेश मंडळाची मिरवणूक सायंकाळी ७ वाजता निघाली. ही मिरवणूक क्रांती चौक, गांधी पार्क, गुजरी बाजारमार्गे शिवाजी चौकात दाखल झाली. येथे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, देवस्थानचे अरविंद देशमुख, बाळासाहेब देशमुख, गंगाप्रसाद आणेराव, सुनील देशमुख, परळीकर आदींची उपस्थिती होती. यानंतर राजे संभाजी गणेश मंडळ, सुवर्णकार गणेश मंडळ, न्यू बालाजी गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ आणि सिंधी गणेश मंडळाच्या मिरवणुका दाखल झाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती होती. विविध राजकीय पक्षांनी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्टेज उभारले होते. ढोल-ताशाच्या गजरात गणेश भक्तांकडून जल्लोष साजरा करीत गणरायाला निरोप देण्यात आला. वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात मुर्र्तींचे विसर्जन करण्यात आले.जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील शहरी भागात ४१६ तर ग्रामीण भागात १ हजार २६४ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यातील १ हजार ५७४ गणेश मंडळांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यामध्ये परभणी शहरातील १२५, ग्रामीण ठाण्यांतर्गत ५५, दैठणा ठाण्यांतर्गत ८१, ताडकळस अंतर्गत ६८, पूर्णा ठाण्यांतर्गत ६७, चुडावा ठाण्यांतर्गत ६२, पालम ठाण्यांतर्गत ९४, गंगाखेड ठाण्यांतर्गत १७९, सोनपेठ ठाण्यांतर्गत ५१, पिंपळदरी ठाण्यांतर्गत ५८, मानवत ठाण्यांतर्गत ७३, पाथरी ठाण्यांतर्गत ६२, सेलू ठाण्यांतर्गत १७९, जिंतूर ठाण्यांतर्गत १२०, चारठाणा ठाण्यांतर्गत ६५, बोरी पोलीस ठाण्यांतर्गत ४३ आणि बामणी पोलीस ठाण्यांतर्गत ७८ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलीस अधीक्षकांच्या सर्तकतेने तणाव निवळला४परभणीतील शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांनी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्टेज उभारला होता. याच स्टेजच्या काही अंतरावर सुरेश नागरे समर्थकांच्या वतीने स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी दोन्ही बाजुकडून जोरदार घोषणाबाजी झाली.४याबाबतची माहिती मिळताच याच परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांना पाहताच घोषणाबाजी थांबली. घोषणाबाजी करणारे काही जण तातडीने गायब झाले. त्यानंतर या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.परभणी शहरातील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मनपाच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कृत्रिम हौद तयार करण्यात आला होता. या हौदात विविध मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले.विसर्जन करताना दोघे विहिरीत पडले४मानवत- शहरातील नियोजित विहिरीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करताना तोल जावून दोन युवक विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. उपस्थितांनी तातडीने धाव घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढल्याने संकट टळले.४मानवत शहरातील नृसिंह गणेश मंडळाचे सदस्य श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सुभाष विद्यालयाजवळ असलेल्या विहिरीजवळ आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी काही तरुणांना मूर्ती उचलण्यासाठी मदतीकरीता बोलावले. मूर्ती ट्रॅक्टरवरुन खाली घेत असताना मूर्तीचे वजन जास्त असल्याने व मूर्तीचा भार सहन न झाल्याने तोल जावून मंडळाचे सदस्य दीपक पाटील आणि नितीन कुमावत विहिरीत पडले. याचवेळी उपस्थित सदस्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने दोन्ही तरुणांना विहिरीतून बाहेर काढले. यामधील दीपक पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.संजय जाधव- आनंद भरोसेंनी खेळली फुगडी४गांधी पार्क भागात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी भाजपाच्या वतीने स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी स्टेजवरील उपस्थित महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांची खा.जाधव यांनी भेट घेतली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भरोसे आणि खा. जाधव यांनी फुगडी खेळली. त्यानंतर भाजपाच्या स्टेजला आ.डॉ.राहुल पाटील यांनी भेट दिली. यावेळी आ.पाटील व भरोसे यांच्यात हस्तांदोलनही झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रमcollectorजिल्हाधिकारी