शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बॉम्ब बाळगणाऱ्यांना देशभक्त ठरविले जातेय - कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी ( परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत कन्हैय्याकुमार बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर, नगराध्यक्षा मीना भोरे, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, ह.भ.प. सारंगधर महाराज, दादासाहेब टेंगसे, मुंजाजी भाले, राजीव पामे, अनिल नखाते, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, तुकाराम जोगदंड, दशरथ सूर्यवंशी, तबरेज खान दुर्राणी, जुनैद खान दुर्राणी, एकनाथ शिंदे, अशोक गिराम, कॉ.राजन क्षीरसागर, लिंबाजी कचरे, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला; परंतु, कर्मचाºयांच्या वेतनामध्ये वाढ होण्याऐवजी कमी वेतन झाले आहे, ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांचा कालावधी मागितला होता. नोटाबंदीने नक्षलवादी चळवळी थांबल्या जातील, अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा केला गेला होता. आता नोटाबंदीला अनेक महिने उलटले आहेत तरीही रोजच देशाच्या सिमेवर जवान अतिरेक्यांसोबत लढताना शहीद होत आहेत. याचे उत्तर आता पंतप्रधानांकडे नाही. देशात आज घरामध्ये बॉम्ब बाळगणाºयांना देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही ठरविले जात असल्याचा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार याने केला. यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, भारतीय संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील. संविधानामुळेच सर्वांना समान प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी बोलताना वरपूडकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे धोरण सर्व सामान्यांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजाहेद खान यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड. अमोल गिराम यांनी केले. कार्यक्रमास मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमार